श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सशस्त्र पोलिसांच्या ९व्या बटालियनवर अतिरेक्यांनी केलेल्या एका भ्याड हल्ल्यात २ पोलीस शहीद, तर १२ जण जखमी झाले आहेत. त्यातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. सर्व जखमी पोलिसांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात येत आहेत. पाक स्थित ‘लष्कर-ए-तैबा’शी संबंधित ‘काश्मीर टायगर्स’ गटाने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
येथील पंथा चौक भागातील झेवानमध्ये दुचाकीवरून आलेल्या २ हल्लेखोरांनी सोमवारी सायंकाळी पोलिसांच्या बसवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यांनी प्रथम बसच्या चाकावर गोळीबार करून ते पंक्चर केले. त्यानंतर जवानांवर गोळीबार केला. त्यात २ पोलीस शहीद, तर १२ जण जखमी झाले, तर ५ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. घटनास्थळी चारही बाजूंनी लष्करी कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत. त्यामुळे या भागात हल्ला होणे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत चिंताजनक मानले जात आहे. हल्ल्यानंतर पोलिसांनी अतिरेक्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी या भागात मोठ्या प्रमाणात कॉम्बिंग ऑपरेशन राबवले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या बसवर हल्ला झाला ती बुलेटप्रुफ नव्हती. बहुतांश पोलिसांकडे सुरक्षा कवच व लाठ्या वगळता अन्य कोणतीही शस्त्रे नव्हती. उल्लेखनीय बाब म्हणजे काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात शुक्रवारीच अतिरेक्यांच्या हल्ल्यात २ पोलीस शहीद झाले होते. त्यानंतर २ दिवसांतच ही घटना घडल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. बांदीपोराच्या गुलशन चौकात ही घटना घडली होती.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …