काशीमध्ये तीन दिवस दिवाळी
७ लाख घरांत प्रसाद पाठवणार
वाराणसी – काशीत अद्वितीय, अप्रतिम आणि वास्तुकलेचा अद्भूत नमुना ठरावा, असा काशी विश्वनाथ कॉरिडॉर भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. भगवान शिवाच्या नगरीत १२, १३, १४ डिसेंबरला देव दीपावलीसारखे वातावरण असेल. भाविकांना यातून भव्यतेची प्रचिती सहजपणे येऊ शकेल. कॉरिडॉर भाविकांना मंत्रमुग्ध करतानाच आध्यात्मिक अनुभव देणारा ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १३ डिसेंबर रोजी दीपप्रज्ज्वलनाने लोकार्पण केले जाणार आहे. त्यासाठी व्यापक तयारी सुरू झाली आहे. लोकार्पणाच्या निमित्ताने बाबा विश्वनाथाच्या आवडीची फुले शेजारच्या अनेक राज्यांतून मागवण्यात आली आहेत. त्यात मंदार, गुलाब, झेंडूसह इतर अनेक फुले मागवण्यात आली आहेत. पुष्प सजावटीतून वाराणसीचे सौंदर्य आणखी खुलणार आहे. श्री काशी विश्वनाथ धामच्या लोकार्पण सोहळ्याला अभूतपूर्व व ऐतिहासिक बनवण्यासाठी काशीतील प्रत्येक घरात उत्सवासारखे वातावरण असेल. सर्व घरांत दिवे उजळतील.
या काळात देव दीपावलीसारखे चित्र दिसेल. यासाठी संपूर्ण काशीत तयारी केली जात आहे. सात लाख घरांत प्रसाद पोहोचवला जाणार आहे. बीएचयूचे राजकीय विभागाचे अधिष्ठाता प्रोफेसर कौशल किशोर मिश्रा म्हणाले, मोदींनी कॉरिडॉर तयार करून सनातन धर्माच्या अनुयायांमध्ये आपली प्रतिमा मजबूत केली आहे. सरकार हा प्रकल्प पूर्ण करून निवडणुकीत त्याला मॉडेल म्हणून मांडू शकते. मोदी ८ मार्च २०१९ रोजी श्रीकाशी विश्वनाथ धामच्या भूमिपूजनात सहभागी झाले होते. तेव्हा कॉरिडॉरच्या प्रकल्पासाठी ३३९ कोटी रुपयांच्या खर्चाची योजना तयार करण्यात आली होती. पुढे ही योजना वाढवून ८०० कोटी रुपयांवर पोहोचली.
भाजपशासित मुख्यमंत्र्यांचे संमेलन
१३ डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते श्री काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण होईल. कार्यक्रमासाठी संत, विद्वानही काशीत दाखल होतील. १४ डिसेंबर रोजी भाजपशासित मुख्यमंत्र्यांचे संमेलनदेखील पवित्र नगरीत प्रस्तावित आहे. १७ डिसेंबरला देशभरातील महापौर काशीत दाखल होतील.
५१ हजार ठिकाणी, ११ ज्योतिर्लिंगांवर लोकार्पण कार्यक्रमाचे थेट प्रसारण
१३ डिसेंबर रोजी ७ लाख घरांपर्यंत पुस्तिका तथा प्रसादाचे वितरण होणार आहे. या कार्यक्रमाचे देशभरातील १५ हजार ४४४ मंडळांत ५१ हजार ठिकाणी थेट प्रक्षेपण केले जाईल. त्यात प्रत्येक ठिकाणी ५०० ते ७०० लोक कार्यक्रमाशी जोडले जातील. १२ तारखेस १३५ कोटी लोक हा कार्यक्रम पाहू शकतील. इतर ११ ज्योतिर्लिंगांच्या तीर्थस्थळी लोकार्पण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे.
विश्वनाथाला प्रिय फूल मंदार, गुलाबांनी कॉरिडॉरची सजावट
पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ डिसेंबरला काशी गाठून सर्वात आधी काशीतील बाबा कालभैरवाच्या दरबारात हजेरी लावतील. येथे आशीर्वाद घेऊन ते राजघाटला जातील. तेथून ते बोटीने ललिता घाटावर जातील. गंगेचे दर्शन घेऊन पवित्र जल घेऊन पायी कॉरिडॉरच्या मार्गाने श्री काशी विश्वनाथाच्या गर्भगृहात जातील. अभिषेक झाल्यानंतर दोन तासांच्या पूजेत सहभागी होतील. नंतर लोकार्पण करतील.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …