काळाचौकी मर्डर केस : पोटच्या पोरीला मारणाऱ्या ‘त्या’ आरोपी महिलेने सांगितले हत्येचे कारण

मुंबई – काळाचौकी परिसरातून तीन महिन्यांच्या मुलीच्या अपहरणाचा बनाव करत, आपल्या मुलीची हत्या करणाऱ्या त्या महिलेने आपण हत्या का केली, याचे कारण सांगितले आहे. मुलगा न झाल्यामुळे सासरच्या मंडळींच्या टोमण्यांना वैतागून तीन महिन्यांच्या मुलीची हत्या केल्याची कबुली त्या महिलेने दिली. या जन्मदात्रीने पोटच्या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह पाण्याच्या टाकीत ठेवला होता. मुंबईतील काळाचौकी परिसरातील फेरबंदर भागात संघर्ष सदन इमारतीत मंगळवारी ही घटना घडली होती. भांडी विकणाऱ्या महिलेने आपल्या बाळाचे अपहरण केल्याची खोटी तक्रार ३६ वर्षीय सपना मगदूम हिने पोलिसांत केली होती, पण हे सर्व खोटे असल्याचे पोलीस तपासात उघड झालेले. दरम्यान, आरोपी महिलेचा विवाह २०११ मध्ये झाला होता. या दाम्पत्याला एक मुलगी आहे. दुसऱ्यांदा गर्भवती असताना तिच्या गर्भात मुलगी असल्याची कुणकुण कुटुंबीयांना लागली. त्यामुळे त्यांनी महिलेचा गर्भपात केला. अशाच प्रकारे आणखी तीन वेळा तिचा गर्भपात करण्यात आला. ऑगस्ट महिन्यात तिने मुलीला जन्म दिला. त्यानंतर सासरच्या कुटुंबीयांनी तिच्याशी सर्व संबंध तोडले. याच रागातून तिने बाळाची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितल्याचे कळते.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …