कार्तिक आर्यनला करायचीय विराट कोहलीची बायोपिक

 

बॉलीवूडमध्ये बायोपिक बनणे ही आता खूप नॉर्मल गोष्ट झाली आहे. प्रत्येक कलाकार कोणत्या ना कोणत्या व्यक्तीची कथा रूपेरी पडद्यावर साकारताना दिसून येतोय. आता एकीकडे अनुष्का शर्मा ही झूलन गोस्वामीच्या व्यक्तिरेखेत ‘चकदे एक्स्प्रेस’मध्ये दिसून येणार आहे, तर दुसरीकडे कार्तिक आर्यनला देखील जर विराट कोहलीच्या क्रिकेट प्रवासाचा हिस्सा बनण्याची संधी मिळाली तर तो ही संधी मुळीच दवडणार नाहीयं.
अलीकडेच ओटीटीवर रिलीज झालेल्या ‘धमाका’ या चित्रपटाच्या यशानंतर आता कार्तिक २०२२ मध्येही अनेक चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे. यामध्ये ‘भुलभुलैया २’, ‘फ्रेडी’ आणि ‘शहजादा’ या चित्रपटांचा समावेश आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कार्तिकने म्हटले होते त्याला कॉमेडी व थ्रिलर सस्पेंसव्यतिरिक्त एक क्रिकेट बायोपिक करण्याचीही इच्छा आहे. जेव्हा कार्तिकला विचारणा करण्यात आली की, त्याला कोणत्या क्रिकेटरची बायोपिक करायला आवडेल?, तर त्यावर बोलताना कार्तिकने लगेचच विराट कोहलीचे नाव घेतले.

अलीकडेच कार्तिकने एका क्रिकेटरच्या भूमिकेतील आपला फोटो शेअर केला होता. त्यावरून कार्तिक हा क्रिकेटवर आधारित चित्रपटात काम करत असल्याचा अंदाज बांधण्यात आला, परंतु जेव्हा कार्तिकला याबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा मात्र त्याने हा लूक कोणत्याही चित्रपटासाठी नाही तर एका ॲडसाठी होता, असे स्पष्ट केले. आता जे काही असेल,परंतु भविष्यात एखाद्या निर्माता-दिग्दर्शकाने विराट कोहलीवर चित्रपट काढण्याचे ठरवले तर त्या व्यक्तिरेखेसाठी त्यांना अभिनेत्याचा शोध घेण्याकरिता मेहनत घ्यावी लागणार नाहीयं. कारण कार्तिक आधीच आपली मन की बात सांगून मोकळा झाला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …