ठळक बातम्या

कार्तिक आर्यनने घेतला रस्त्यावरील चाऊमिनचा आनंद

बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या चित्रपटांमध्ये चांगलाच बिझी असून, तो धडाधड बिग बजेट चित्रपट साइन करत आहे. याशिवाय त्याचे अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावरही आहेत. अलीकडेच कार्तिक बिग बॉस-१५मध्ये पोहचला होता. त्यानंतर तो चक्क रस्त्यावर उभे राहून चाऊमिनचा स्वाद लुटताना दिसून आला.

आपण नेहमीच पाहतो की, सेलिब्रेटीज हे साधारणपणे गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळतात, परंतु या सर्वांपेक्षा कार्तिक आर्यन खूप वेगळा आहे. स्टार असूनही रस्त्यावर सामान्य व्यक्तीसारखे भटकण्यात त्याला काहीच वावगे वाटत नाही. आता कार्तिकचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात तो आपल्या मित्रांसोबत स्नॅककॉर्नरवर चाऊमिनची मजा चाखताना दिसून आला. आर्यननेही हसत-हसत आपल्या मित्रासमवेत फोटो काढून घेतले आहेत. तो यात डेनिम लूकमध्ये दिसून येतोय. त्यावेळी कार्तिकने फूड व्हॅन समोर आपली लॅम्बोर्गिनी उभी केली आणि या महागड्या गाडीच्या बोनेटवर ठेऊन तो आपल्या मित्रासमवेत चाऊमिन खाताना दिसून येतोय. हे फोटो वायरल भयानीने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …