ठळक बातम्या

कामगाराने केले मालकाच्या चार वर्षांच्या मुलाचे अपहरण

  • पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुलगा सुखरूप

मुंबई/नाशिक – एखाद्या व्यक्तीचा राग केव्हा व कसा निघेल याचा काही नेम नाही. मुंबईतील नेहरू नगर पोलीस ठाण्यात एक अशीच विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका कामगाराने आपल्या मालकासोबत वाद झाल्यानंतर, थेट मालकाच्या ४ वर्षीय मुलाचे अपहरण केले. अपहरणानंतर आरोपीने नाशिक गाठले. दुसरीकडे, घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलीस सतर्क झाले व अवघ्या १२ तासांत आरोपीला जेरबंद केले. ४ वर्षीय मुलगा सुखरूप असून, पोलिसांनी त्याला पालकांकडे स्वाधीन केले आहे.
अजय तिवारी, असे अटक केलेल्या आरोपी कामगाराचे नाव आहे, तर महेंद्र बालोडीया असे फिर्यादीचे नाव असून, ते ठक्कर बाप्पा कॉलनीतील रहिवासी आहेत. फिर्यादी महेंद्र यांचा चप्पलचा व्यवसाय आहे. त्यांच्या दुकानात चप्पल बनवण्यासाठी चार-ते पाच कामगार काम करतात. आरोपी अजय तिवारी देखील त्यांच्या दुकानात चप्पल तयार करण्याचे काम करतो. चार दिवसांपूर्वी आरोपी कामगार अजय तिवारी आणि मालक महेंद्र बालोडीया यांच्यात वाद झाला होता. आरोपी अजय तिवारी दारू पिऊन कामावर आल्याने मालक महेंद्र बालोडीया यांनी त्याला कामावरून काढून टाकले होते. त्यामुळे अजयचा महेंद्र यांच्यावर राग होता. याच रागातून मालकाला धडा शिकवण्यासाठी आरोपीनं महेंद्र यांच्या चार वर्षीय मुलाच्या अपहरणाचा कट रचला. मुलाचे अपहरण झाल्याचे कळताच महेंद्र बालोडीयांनी तातडीने मुंबईतील नेहरू नगर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …