कान्ये वेस्ट-ज्युलिया फॉक्स रिलेशनशीपमध्ये


प्रेज गॉड अल्बमचा गायक कान्ये वेस्ट आणि द अनकट जेम्समध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री ज्युलिया फॉक्स हे आता एकमेकांना डेट करत आहेत. या वृत्ताचा खुलासा पर्सन मॅगझीनद्वारे करण्यात आला आहे. 31 वर्षीय ज्युलिया आणि 44 वर्षर्ीय कान्ये वेस्टने गुरुवारी या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत आपली लव्ह स्टोरी शेअर केली. किम कार्डेशियनला घटस्फोट दिल्यानंतर कान्ये आपल्या नव्या रिलेशनशीपमध्ये कमालीचा खुश आहे.
या मुलाखतीत ज्युलियाने सांगितले की ती नववर्षाच्या पूर्वसंध्येला मियामीमध्ये कान्येला भेटली आणि त्यांचे लव्ह एट फर्स्ट साईट झाले. त्याची एनर्जी खूप पॉझिटीव्ह आणि मजेदार होती. त्याने मला आणि माझ्या फ्रेंड्सना रात्रभर हसवले आणि नाचण्यास भाग पाडले. आमची ती रात्र इतकी मजेदार गेली की आम्ही स्लेव्ह प्ले पाहण्यासाठी न्यूयॉर्क शहरात पुन्हा जाण्याचा निर्णय घेतला. कान्येची फ्लाईट संध्याकाळी 6 वाजता लॅँड झाली. तरीही तो नाटक पाहण्यासाठी वेळेवर पोहोचला, जे संध्याकाळी 7 वाजता सुरु झाले आणि त्याच्या टाईम मॅनेजमेंटने मी खुप खुश झाले. आम्हा दोघांमध्ये सर्व काही आर्गेनिक ठरले. मला माहित नाही की भविष्यात काय झाले. परंतु जर माझे भविष्य असेच राहिले तर मला या मार्गावर चालण्याची इच्छा आहे’ असेही ज्युलियाने यावेळी स्पष्ट केले.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …