सलामीवीरांची अभेद्य भागीदारी
कानपूर – भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. टीम इंडियाचा पहिला डाव ३४५ धावांवर आटोपल्यानंतर न्यूझीलंडच्या पहिल्या डावाची सुरुवात झाली. न्यूझीलंडने दुसरे आणि तिसरे सत्र यशस्वीरीत्या खेळून काढत नाबाद १२९ धावा करून दुसरा दिवस आपल्या नावावर केला. दिवसअखेरीस सामना थांबविण्यात आला तेव्हा विल यंग आणि टॉम लॅथम क्रीझवर होते. पहिल्या डावाच्या आधारे न्यूझीलंड सध्या भारतापेक्षा २१६ धावांनी मागे आहे. पाहुण्या संघाने वेगवान गोलंदाज टीम साऊथीच्या पाच विकेट्सच्या जोरावर भारताचा डाव ३४५ धावांत संपुष्टात आणला.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात येथील ग्रीनपार्क मैदानात पार पडणाऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघाकडून उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडत आहे. आधी दमदार फलंदाजीने भारताने ३४५ धावांचा डोंगर उभारला आहे. त्यानंतर न्यूझीलंडने देखील चोख प्रत्युत्तर देत दुसऱ्या दिवसाच्या शेवटी एकही गडी न गमावता १२९ धावा केल्या आहेत. दोन्ही सलामिवीरांनी अर्धशतके पूर्ण करीत एक चांगली धावसंख्या उभारण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे. दिवस अखेरीस न्यूझीलंडकडून टॉम लॅथम (५०) आणि विल यंग (७५) खेळत होते. ते नाबाद राहिले आहेत. दुसऱ्या दिवसाच्या शेवटी न्यूझीलंडने ५७ षटके खेळत एकही गडी न गमावता १२९ धावा केल्या आहेत. भारताच्या एकाही गोलंदाजाला विकेट घेता न आल्याने तिसऱ्य दिवशी तरी भारत न्यूझीलंडवर आक्रमण करणार का? की न्यूझीलंडचा संघ वरचढ राहणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …