सोलापूर – २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपने ‘काँग्रेसमुक्त भारत’ अशी घोषणा दिली होती. त्यांच्या प्रत्येक भाषणात ‘काँग्रेसमुक्त भारत’ हा शब्दप्रयोग ऐकायला मिळायचा. ती भूमिका भाजपनेबदलली की काय, अशी शंका वाटण्यासारखेवक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेआहे.
सोलापुरात एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी चक्क काँग्रेस नेत्यांचं कौतुक केले. काँग्रेसचे नेते वेल कल्चरड आहेत. ते दरोडेखोर नसतात, पण राष्ट्रवादीवर भरवसा नाही. त्यांचे सकाळी एक राजकारण असतं आणि रात्री दुसरंच राजकारण असतं. एक वेळ काँग्रेस परवडली. काँग्रेस नेतेसुसंस्कृत आहेत. ते दरोडेखोर नसतात. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादीच्या सलगीला भुलणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीनेभाजपला पाठिंबा देऊ केला होता. २०१९ मध्येअजित पवार यांनी काही आमदारांना घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथही घेतली होती, मात्र, दीड दिवसांतच राजीनामा देत त्यांनी माघार घेतली होती. त्यानंतर भाजपला बाजूला ठेवून राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाले. तेव्हापासून भाजप आणि राष्ट्रवादीच्या संबंधांमध्येवितुष्ट आलेआहे. केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांनी शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादीच्या सर्वाधिक नेत्यांना लक्ष्य केलं आहे. काँग्रेसच्या बाबतीत मात्र भाजपनं सौम्य भूमिका घेतल्याचं दिसत आहे. भाजपचे नेतेही महाविकास आघाडी सरकारबद्दल बोलताना शिवसेना व राष्ट्रवादीवर टीका करताना दिसतात. आजही पाटील यांनी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीवर निशाणा साधला. मात्र, ते करताना त्यांनी काँग्रेसचं चक्क कौतुक केल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. आम्ही या आंदोलनात सहभागी होऊ. आतापर्यंत राज्यात एसटीच्या २७ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. भविष्यात राज्य राज्यावर भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यास एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्व सुविधा देण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध असल्याचे याप्रसंगी पुढे बोलताना पाटील म्हणाले .
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …