ठळक बातम्या

काँग्रेसचे निवडणुकांपूर्वी जन जागरण अभियान-१४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान आंदोलन

१४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान आंदोलन
नवी दिल्ली – केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारविरोधात काँग्रेस आता आंदोलनाच्या भूमिकेमध्ये दिसत आहे. काँग्रेस वाढत्या महागाईच्या मुद्यावरून देशभरात आंदोलन करणार आहे. वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलच्या दरात झालेली वाढ आणि खाद्य पदार्थांच्या वाढत्या किमतींविरोधात काँग्रेसने जनजागृती मोहीम सुरू करण्याची घोषणा केली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी याबाबत घोषणा केली. १४ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सुरजेवाला यांनी सांगितले. या अभियानांतर्गत अर्थव्यवस्थेचे अपयश, बेरोजगारी तसेच महागाईचे प्रश्न अग्रस्थानी असतील. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वांनी शेती आणि शेतकºयांवर होणारे हल्ले, अभूतपूर्व बेरोजगारी, वाढती महागाई यांविरोधात लढण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला असल्याचे सुरजेवाला यांनी म्हटले होते.
यामध्ये काँग्रेसने पक्षाचे खासदार, आमदारांच्या नेतृत्वाखाली १४ नोव्हेंबरपासून केंद्राच्या विरोधात पदयात्र, प्रभातफेरी काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन समितीची बैठक सोमवारी झाली. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वद्रा राज्यातील निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून उत्तर प्रदेशमध्ये अशाच सभा घेऊ शकतात आणि पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांना देशाच्या विविध भागांना भेट देण्यास सांगितले आहे. प्रचाराच्या शुभारंभाच्या अगोदर, काँग्रेसने १२ ते १४ नोव्हेंबरदरम्यान वर्धा, महाराष्ट्र येथे कार्यकर्त्यांच्या गटासाठी कार्यशाळा आयोजित केली आहे.

त्यांना अर्थव्यवस्था, शिक्षण, आरोग्य आणि कृषी यांसारख्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून जनसामान्यांपर्यंत कसे पोहोचायचे आणि त्यांना प्रभावित झालेल्या समस्यांना कसे स्पर्श करायचे याचे प्रशिक्षण दिले जाईल. भाजपच्या राजवटीत इंधनाच्या किमती वाढणे, महागाईचे परिणाम, कृषी कायदे आणि बेरोजगारी यासंबंधीची आकडेवारी पक्ष कार्यकर्त्यांकडे असेल.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …