कसोटी मालिकेतील ‘त्या’ गोष्टीबाबत खुलासा करणार नाही – टेलर

कोलकाता – न्यूझीलंडचा फलंदाज रॉस टेलरच्या मते, भारतविरुद्ध त्यांच्या खेळपट्टीवर खेळणे कोणत्याही संघासाठी मोठे आव्हान असते. दरम्यान, टेलरने आम्ही आगामी कसोटी मालिकेत यजमान संघाचा मुख्य ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनचा सामन करण्याबाबत आपल्या योजनेचा खुलासा करण्यास नकार दिला. भारत व विश्व कसोटी चॅम्पियन संघ न्यूझीलंड दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना कानपूरमध्ये २५ नोव्हेंबरपासून खेळतील. ही मालिका विश्व कसोटी चॅम्पियनशीपच्या दुसऱ्या चक्राचा भाग आहे. टेलर म्हणाला, निश्चित रूपात हे आव्हान असेल, पण त्यासाठी सज्ज आहोत. मला वाटते की, भारताच्या खेळपट्टीवर खेळणे वा ऑस्ट्रेलियात परदेशात खेळण्यापेक्षा कठीण आव्हान कोणतेच नाही. सध्याच्या वेळी कसोटी क्रिकेटमध्ये ही दोन सर्वात मोठी आव्हान आहेत. टेलर रविवारी म्हणाला की, पण एका संघाच्या रूपात आम्ही तयार आहोत व आम्ही जाणतो की, आम्ही ‘अंडरडॉग’ (छुप्पारुस्तम) आहोत, पण आम्ही चांगली कामगिरी करण्यास तयार आहोत. जेव्हा देखील आपण भारतात त्यांच्या खेळपट्टीवर खेळतो, तर आपण नेहमीच ‘अंडरडॉग’ असतो, मग जगातील क्रमांक एकची टिम असो वा नाही. अनुभवी फलंदाज टेलर म्हणाला की, अश्विन व अक्षर पटेल या भारतीय स्पिन जोडीचा सामना करणे न्यूझीलंडसाठी कसोटी मालिकेत महत्त्वाचा भाग असेल. जेव्हा त्याला विचारण्यात आले की, अश्विनच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी त्यांच्याकडे कोणती योजना आहे, तर तो म्हणाला की, मला येथे आपल्या योजनेचा खुलासा करायचा नाही. मला नाही ठाऊक की, भारताने कोणत्या खेळाडूंना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. अक्षर पटेलने इंग्लंडविरुद्ध मोठी भूमिका बजावली होती. ते तीन फिरकीपटू उतरवतील, त्यात निश्चित रूपात अश्विन असेल. तो खूप चांगला गोलंदाज आहे, खासकरून अशा परिस्थितीत. मालिका कशीही असो, आम्ही त्याच्याविरुद्ध कसे खेळतो, ती महत्त्वाची भूमिका असेल.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …