ठळक बातम्या

कसोटी क्रमवारी: अश्विन दुसऱ्या स्थानी, तर मयंक, एजाझ पटेलने घेतली मोठी झेप

नवी दिल्ली – टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेल्या भारतीय संघाने मायदेशात न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका १-० अशी जिंकली. या मालिकेतील दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर मयंक अग्रवाल, रविचंद्रन अश्विन आणि न्यूझीलंडचा फिरकीपटून एजाज पटेलनेही कसोटी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. मुंबई कसोटी ही आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपचा एक भाग होती. या सामन्यानंतर टीम इंडियाच्या इतर खेळाडूंनाही फायदा झाला आहे.
फलंदाजांच्या क्रमवारीत रोहित शर्मा आणि विराट कोहली अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. मुंबई कसोटीत रोहित खेळला नाही, तर कोहलीने शून्य आणि ३६ धावा केल्या. पहिल्या डावात १५० धावा आणि दुसऱ्या डावात ६२ धावा करणाऱ्या मयंक अग्रवालनेआयसीसी कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या क्रमवारीत ३० स्थानांच्या सुधारणेसह ११ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. अग्रवाल आता टॉप १० फलंदाजांमध्ये स्थान मिळवण्याच्या एक पाऊल मागे आहे, यापूर्वी त्याने हे स्थान नोव्हेंबर २०१९ मध्ये मिळवले होते. गॅले कसोटीत श्रीलंकेचा सामनावीर धनंजय डी सिल्वा याने दुसऱ्या डावात नाबाद १५५ धावांची खेळी साकारली. या कामगिरीच्या जोरावर त्याने१२ स्थानांनी झेप घेत २१ व्या क्रमांकावर पोहोचला. सलामीचा फलंदाज शुभ मन गिंल ४५ स्थानावर आहे.न्यूझीलंड च्या डेरिल मिचेल याला ही २६ स्थानाची सुधारणा करत ७८ व्या स्थानावर पोहोचला आहे
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील अष्टपैलू कामगिरीमुळेआर अश्विनची आयसीसी कसोटी अष्टपैलूआणि गोलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. न्यूझीलंड विरूद्धच्य दोन कसोटीतून १४ बळी घेऊन ७० धावा केल्यामुळेअश्विननेआयसीसीच्या अष्टपैलू खेळाडूंच्या विश्वक्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.अश्विननेएका स्थानाच्या सुधारणेसह दुसरा क्रमांक पटकावला. बेन स्टोक्स तिसऱ्या क्रमांकावर आला. रवींद्र जडेजा मात्र दोन स्थान खाली सरकला आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत वेस्ट इंडिजचा जेस न होल्डर अग्रस्थानी आहे.
गोलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट क मिन्स अव्वल स्थानावर आहे, तर भारत-न्यूझीलंड मालिकेत अश्विनने भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे.यामालिकेत त्यानेहरभजन सिंग याचा ४१७ विकेट्सचा विक्रम मोडला .
गोलंदाजांच्या क्रमवारीत एजाज पटेलनेही कसोटी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. तो २३ स्थानावर पोहोचला आहे. मुंबईत जन्मलेला पटेल कसोटी डावात सर्व१० बळी घेणारा तिसरा क्रिकेटपटूठरला. त्यानेजिम लेकर आणि अनिल कुंबळे यांची बरोबरी केली. या सामन्यात त्याने१४ विकेट घेतल्या. भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेला सुरूवात होण्यापूर्वी एजाझ पटेल ६२ व्या स्थानावर होता .फिरकीपटू लसिथ एम्बुल्डेनिया आणि रमेश मेंडिस यांनाही क्रमवारीत फायदा झाला आहे. एम्बुल्डेनिया (सात विकेट्सने) पाच स्थानांनी प्रगती करत ३२ व्या स्थानावर आहे, तर मेंडिसने ११ विकेट्सवरून १८ स्थानांनी झेप घेत ३९ व्या स्थानावर पोहोचले आहे. मोहम्मद सिराजने ४१ वे स्थान गाठले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …