कल्याण – कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मोहने उदंचन केंद्राजवळील रॉ वॉटर चॅनेलमधील गाळ काढणे, तसेच मोहिली उदंचन केंद्र व जलशुद्धीकरण केंद्रास वीजपुरवठा करणाऱ्या उच्चदाब विद्युत फिडर्सच्या देखभाल, दुरुस्तीचे काम महावितरण कंपनीकडून मंगळवार, १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या बारावे, मोहिली, नेतीवली, टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रामधून कल्याण पूर्व, पश्चिम, ग्रामीण, आणि डोंबिवली पूर्व, पश्चिम विभागास होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तरी या विभागातील नागरिकांनी या दिवशी पाण्याचा साठा करण्याचे आवाहन केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …