कर्नाटकात कोरोनाचे थैमान : एकाच शाळेतील ३२ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

एकाच शाळेतील ३२ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह
बंगळुरू – कर्नाटकमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. कोडगू जिल्ह्यातील निवासी शाळेतील ३२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये १० मुली आणि २२ मुलांचा समावेश आहे. एका आठवड्यापूर्वी या सर्व विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. हे सर्व विद्यार्थी नववी ते १२ वीच्या वर्गांतील आहेत.
जवाहर नवोदय विद्यालयात ही घटना घडली आहे. शाळेतील १० विद्यार्थ्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असून, २२ विद्यार्थ्यांना कोणतीही लक्षणे जाणवत नाही आहेत. एका कर्मचाºयालाही लागण झाली आहे. या कर्मचाºयाला कोरोनाची लक्षणे जाणवत आहेत. दरम्यान, या सर्वांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शाळेत एकूण २७० विद्यार्थी असून, सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …