कर्नाटकने पारा चढवला : ‘ ओमिक्रॉन’ रुग्णाच्या संपर्कातील ५ जण पॉझिटिव्ह

बंगळुरू – कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह देश अलर्टवर आहे, पण संपूर्ण देशाला काळजीत टाकणारे अहवाल पुन्हा प्राप्त झाले आहेत. कर्नाटकमध्ये जे दोन ओमिक्रॉन पेशंट आहेत, त्यातील एकाच्या संपर्कातील पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचही टेन्शन वाढले आहे. कारण कर्नाटक हा महाराष्ट्राचा शेजारी आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात आणि कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. विशेष म्हणजे बंगळुरूमध्ये जे दोन ओमिक्रॉनची लागण झालेले पेशंट सापडले आहेत, त्यातल्या एकाने कुठेही विदेशात प्रवास केलेला नाही. त्यामुळेच त्याला ओमिक्रॉनची लागण कुठून झाली? हा मोठा सवाल आहे.
कर्नाटकची राजधानी बंगळुरूत हे दोन्ही ओमिक्रॉनचे रुग्ण सापडलेले आहेत. त्यातला एक जण हा दक्षिण आफ्रिकेचा नागरिक आहे. त्याचे वय ६६ वर्षे आहे. गेल्या महिन्यात तो दुबई मार्गे बंगळुरूत पोहोचला, तर दुसरा रुग्ण हा एका स्थानिक रुग्णालयामध्ये काम करणारा ४६ वर्षीय डॉक्टर आहे. विशेष म्हणजे या डॉक्टरने कुठेही प्रवास केला नसेल तर त्याला ओमिक्रॉनची लागण झाली कुठून हा मोठा सवाल आहे. विशेष म्हणजे दोन्ही रुग्णांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. दोघांनाही ओमिक्रॉनची सौम्य लक्षणे आहेत. बंगळुरूतील दोन्ही रुग्णांचा विरोधाभासही समोर येत आहे. जे पाच नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत ते डॉक्टरच्या संपर्कातील आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …