ठळक बातम्या

कर्नाटकचे मुख्यमंत्री मुंबई-कर्नाटक प्रदेशाचे नाव बदलणार

बंगळुरू – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मुंबई-कर्नाटक प्रदेशाचे नाव बदलून ‘कित्तूर कर्नाटक प्रदेश’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, मुंबई-कर्नाटक प्रदेशाचे नाव बदलून ‘कि त्तूर कर्नाटक प्रदेश’ केले जाईल. वारंवार सीमा वाद निर्माण होत असताना, जुने नाव ठेवण्यात अर्थ नाही, त्यामुळे या भागाचे नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्याच्या ६५व्या स्थापना दिनानिमित्त असलेल्या ‘कर्नाटक राज्योत्सवा’दरम्यान बोम्मई यांनी ही घोषणा केली.

हैदराबाद-कर्नाटक क्षेत्राचे नाव आम्ही नुकतेच बदलून कल्याण-कर्नाटक केले आहे. आता येत्या काही दिवसांत आम्ही मुंबई-कर्नाटक प्रदेशाचे नाव बदलणार आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले. बेळगाव जिल्हा आणि कर्नाटकातील काही सीमावर्ती भाग महाराष्ट्रात विलीन करण्याच्या महाराष्ट्रातील राजकारण्यांनी वारंवार केलेल्या दाव्यांवर मुख्यमंत्री बोलत होते. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही मुख्ममंत्री बोम्मई म्हणाले. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल, असे बोम्मई यांनी सांगितले आहे. उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांच्या गटाला कित्तूर कर्नाटक प्रदेश, असे नाव देण्यामागील कारण मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …