कर्णधार करण्याआधी कमिन्सला विचारण्यात आला हा प्रश्न…

मेलबर्न – ऑस्ट्रेलियाचा नव नियुक्त कसोटी कर्णधार पॅट कमिन्सने खुलासा केला की, निवड समितीच्या वतीने संघाची जबाबदारी सोपवण्याआधी त्याला विचारण्यात आले होते की, तुझे काही गुपीत तर नाही ना? व जर असेल तर ते आम्हाला सांगावे लागेल. कमिन्सला ॲशेस मालिके आधी ऑस्ट्रेलियाच्या ४७ व्या कसोटी कर्णधारपदी नियुक्त करण्यात आले, कारण टीम पेनने मागील आठवड्यात पदावरून हटण्याचा निर्णय घेतला होता. कमिन्सला कर्णधार तर माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथला उपकर्णधार बनवण्यात आले, ज्याला ३ वर्षांपूर्वी २०१८ मध्ये बॉल टेम्परिंग प्रकरणानंतर निलंबित करण्यात आले होते. हे विचारल्यावर की, तुला निवड समितीने कर्णधारपदी नियुक्त करण्याआधी कोणत्या गोष्टीला स्वीकार करण्यास सांगितले होते का? तर कमिन्सने त्यावर होकार दिला. तो म्हणाला, हो, मला एक प्रश्न विचारण्यात आलेला. पण मी त्याबाबत विस्तारात सांगणार नाही. ती वास्तवात एक खुली चर्चा होती. आम्ही खूप वेगवेगळ्या गोष्टींबाबत चर्चा केली. त्यामुळे आम्हाला खरंच खूप बरे वाटले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …