करिना कपूर, अमृता अरोरा कोरोेना पॉझिटिव्ह

मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर आणि अमृता अरोरा यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. विशेष म्हणजे मागच्या काही दिवसांमध्ये करिना आणि अमृताने अनेक पार्ट्यांना हजेरी लावली असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांच्याच सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
करिना कपूर आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाली असल्याच्या संदर्भात एएनआयने ट्विट केले आहे. दरम्यान, या दोघींनीही कोणत्याही कोरोना नियमांचे पालन न करताच अनेक पार्ट्यांना हजेरी लावल्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेने दिले आहेत.

कोरोना नियमांचे उल्लंघन करून बॉलीवूड पार्ट्यांमध्ये उपस्थित राहिल्यामुळेच करिना आणि अमृता यांना कोरोनाची लागण झाल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी या दोघी त्यांच्या गर्ल्स गँगसोबत पार्टी करताना दिसल्या होत्या. ही पार्टी अनिल कपूर यांची मुलगी रिया कपूरच्या घरी देण्यात आली होती आणि त्यात मलायका अरोरा, करिश्मा कपूर यादेखील सहभागी झाल्या होत्या.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …