करिनाचे प्रोफेशनलिझ्म आत्मसात करायचेय साराला

अभिनेत्री सारा अली खान हिचा आगामी चित्रपट ‘अतरंगी रे’ प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. त्यामुळे सारा अर्थातच या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या प्रमोशनदरम्यानच साराने आपली सावत्र आई अर्थात करिना कपूर खानची भरभरून प्रशंसा केली आहे. त्याचबरोबर करिनाची एक गोष्ट आपल्याला आत्मसात करायची आहे, असा खुलासाही तिने केला आहे.
करिनाने रेडिओ आरजे सिद्धार्थ कन्नन याच्याबरोबर बोलताना सांगितले की, तिला करिना कपूरचे प्रोफेशनलिझ्म आत्मसात करायचे आहे. कारण ती दोन मुलांची आई असूनही आपल्या ब्रँडसाठी काम करते. आपले चित्रपट करत आहे. त्यामुळे करिना माझ्यासाठी नेहमीच एका अभिनेत्रीचे जिवंत उदाहरण असेल.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …