करण जौहरच्या ३०० कोटींच्या ॲक्शन थ्रिलरमध्ये हृतिकची वर्णी?

बॉलीवूड इंडस्ट्री सध्या अनेक बिग बजेट चित्रपटांची घोषणा करताना दिसतेय. बडे बॅनर सध्या मेगा बजेट चित्रपटांच्या प्लॅनिंगमध्ये बिझी आहेत, तर कारण कोरोनामुळे झालेली गेल्या दोन वर्षांतील हानी भरून काढण्यासाठी हेच चित्रपट हातभार लावतील. अलीकडेच करण जौहरविषयीही अशीच एक खबर समोर आली होती. आतापर्यंत रोमँटीक चित्रपट बनवणारा करण आता ॲक्शन थ्रिलर चित्रपटात आपले नशीब आजमावून पाहणार असल्याची चर्चा सध्या बॉलीवूडमध्ये रंगली आहे.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, करण जौहरच्या या ॲक्शन थ्रिलर चित्रपटाला या वर्षाच्या अखेरीस सुरुवात होईल. सध्या करण जौहर आपला आगामी रॉम-कॉम चित्रपट रॉकी और रानी की प्रेमकहानीमध्ये बिझी आहे. हा चित्रपट आटोपताच करण आपल्या ॲक्शन थ्रिलर चित्रपटाला सुरुवात करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या या चित्रपटासाठी करणने अभिनेता हृतिक रोशन याच्याबरोबर हातमिळवणी केली आहे. हृतिकचा वॉर हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. यामध्ये हृतिक हा बऱ्याच काळानंतर ॲक्शन करताना दिसून आला होता. त्यामुळे ॲक्शन झोनरमध्ये डेब्यू करण्यासाठी आपल्याला हृतिकपेक्षा अन्य कुणीही उत्कृष्ट साथीदार मिळणार नाही, अशी करणची पक्की खात्री आहे. खान बंधूंनंतर हृतिक रोशन हा असा एकमेव स्टार आहे ज्याच्या चित्रपटांची तिकिटे प्रेक्षक हातोहात खरेदी करतात. त्यामुळे धर्मा प्रोडक्शनच्या ॲक्शन थ्रिलरमध्ये हृतिक दिसण्याची दाट शक्यता आहे. तूर्तास हृतिक आपला आगामी चित्रपट विक्रम वेधाच्या रिमेकमध्ये बिझी आहे, ज्यात त्याच्यासोबत सैफ अली खानही दिसून येणार आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …