ठळक बातम्या

कबड्डी : पुणे संघाला महिला गटात जेतेपद

परभणी – पुणे महिला संघ ६८व्या वरिष्ठ महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे सलग दुसऱ्यांदा विजेते ठरले. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या अधिपत्याखाली परभणी जिल्हा कबड्डी असोसिएशनने साई क्रीडा मंडळाच्या सहकार्याने स्पर्धा आयोजित केली होती. परभणी-पाथरी येथील कबड्डी महर्षी बुवा साळवी क्रीडानगरीत संपन्न झालेल्या अंतिम सामन्यात पुण्याने मुंबई शहरचे अतिशय कडवे आव्हान ४६-२९ असे संपुष्टात आणत पार्वतीबाई सांडव चषकावर पुन्हा एकदा आपले नाव कोरले. पुण्याने पहिल्याच चढाईत गडी टिपत सुरुवात झोकात केली, पण मुंबईने देखील गुण घेत त्याला प्रत्युत्तर दिले. मुंबईने पुण्यावर ८व्या मिनिटाला लोण देत १२-०९ अशी आघाडी घेतली. मध्यांतराला मुंबईकडे १९-१६ अशी आघाडी होती, पण उत्तरार्धात मात्र पुण्याने झंजावाती खेळ करीत बाजी पलटविली. त्याची सुरुवात स्नेहल शिंदेने एका चढाईत ३ गडी टिपत केली. सायली केरीपाळेने शिलकी दोन गडी टिपत मुंबईवर लोण देत पुण्याने २५-२४ अशी आघाडी घेतली. पुन्हा झटपट सायली केरीपाळेने एका चढाईत ४ गडी टिपत मुंबईवर दुसरा लोण देत पुण्याची आघाडी ३६-२७, अशी वाढविली आणि सामना १७ गुणांच्या फरकाने हा सामना आपल्या नावे केला. मुंबईकडून पौर्णिमा जेधे जायबंदी झाल्यामुळे मुंबईच्या खेळावर त्याचा परिणाम झाला. पुण्याकडून सायली केरीपाळे, स्नेहल शिंदे, अंकिता जगताप, पूजा शेलार तर मुंबई शहरकडून पूजा यादव, पौर्णिमा जाधव, श्रद्धा कदम, साधना विश्वकर्मा चांगल्या खेळल्या.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …