ठळक बातम्या

कपिल देव यांनी मदन लाल यांच्या रिव्हेंजची कहाणी केली शेअर


’83’ हा चित्रपट रिलीज होण्यास अवघे काही दिवस उरले असून संपूर्ण देश या चित्रपटासाठी उत्सुक असल्याचे चित्र आहे. कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट 1983 च्या क्रिकेट विश्वचषकातील भारताच्या विजयावर आधारित आहे. रणवीर सिंग कर्णधार कपिल देवची भूमिका साकारत आहे, तर हार्डी संधू गोलंदाज मदन लालच्या भूमिकेत दिसणार आहे जिथे ते 1983 च्या क्रिकेट विश्वचषकात भारताच्या विजयाला रीक्रिएट करतील.
चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या असेट्समध्ये कपिल देव यांनी मदन लाल यांच्या रिव्हेंजविषयीचा खुलासा केला. मदन लाल हे 1983 च्या विश्वचषकातील सर्वात प्रभावी गोलंदाज होते.
रणवीर सिंह चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. यासोबतच ताहिर राज भसीन, जीवा, साकिब सलीम, जतिन सरना, चिराग पाटिल, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधू, साहिल खट्टर, अम्मी विर्क, आदिनाथ कोठारे, धैर्य करवा, आर बद्री आणि पंकज त्रिपाठी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. दीपिका पादुकोण या चित्रपटात कपिल देव यांची पत्नी रोमीची व्यक्तिरेखा साकारणार आहे.
रिलायंस एंटरटेनमेंट आणि फैंटम फिल्म्स यांच्याद्वारे कबीर खान फिल्म्स प्रोडक्शनच्या 83 ला सादर करण्यात येणार आहे. रिलायंस एंटरटेनमेंट आणि पीवीआर पिक्चर्स चा हा चित्रपट 24 डिसेंबर 2021 ला हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड़ आणि मलयाळम मध्ये 3डी रिलीज होणार आहे.चित्रपटाची निर्मिती दीपिका पादुकोण, कबीर खान, विष्णु वर्धन इंदुरी, साजिद नाडियाडवाला, फैंटम फिल्म्स, रिलायंस एंटरटेनमेंट यांनी मिळून केली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …