कतरीनानंतर श्रद्धा चढणार बोहल्यावर?


बॉलीवूड ॲक्टर्सचा विवाह हा नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आला आहे. कतरीना कैफ आणि विक्की कौशल यांच्या विवाहाच्या गोष्टी तब्बल दोन महिने सोशल मिडियावर व्हायरल होत होत्या. अखेरीस आज गुरुवारी हे दोघे विवाह बंधनात अडकले. आता खबर आहे की या दोघांच्या पाऊलावर पाऊल ठेवत श्रद्धा कपूरही बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. श्रद्धा कपूर ही फोटोग्राफर रोहन श्रेष्ठ बरोबर रिलेशनशीपमध्ये आहे. अनेकदा या दोघांना स्पॉटही करण्यात आले आहे. आता श्रद्धा कपूरची मावशी पद्मीनी कोल्हापुरे हिने या दोघांच्या विवाहाची हिंट दिली आहे.
अभिनेत्री पद्मीनी कोल्हापुरे हिने अलिकडेच ये गलियां ये चौबारा या गाण्याचे रिक्रीएटेड व्हर्जन लॉँच केले आहे. या गाण्याला पद्मीनीने आपला आवाज दिला आहे. श्रद्धाने हा ट्रॅक आपल्या सोशल मिडियावर शेअर केला आहे, ज्यावर कमेंट करताना पद्मीनीने लिहिले,’ तुझ्या आणि वेदिकाच्या विवाहात मी हेच गाणे गुणगुणेल.’ पद्मीनीने आपल्या या कमेंटबद्दल बोलताना सांगितले की जेव्हापासून हे गाणे शूट करण्यात आले आहे तेव्हापासून हे गाणे माझ्या ह्रदयाच्या अगदी जवळचे गाणे ठरले आहे. मला नेहमीच माझ्या मुलीच्या स्पेशल डेला हे गाणे गुणगुणण्याची इच्छा होती. माझ्याकरिता श्रद्धा आणि वेदिका या दोन्हीही माझ्याच मुली आहेत.’

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …