ठळक बातम्या

कतरिना कैफला हिंदी न बोलण्यामुळे सहन करावे लागले होते रुक्ष वागणे

बॉलीवूड सुपरस्टार शाहरूख खान नेहमी आपल्या सहकलाकारांना कम्फर्टेबल फिल करून देण्यासाठी ओळखला जातो. तो नेहमी आपल्या सोबत काम करणाऱ्या कलाकारांना पब्लिक प्लॅटफॉर्मवर डिफेंड करतानाही पाहायला मिळतो. असेच एकदा कतरिना कैफला हिंदी बोलण्यासाठी जबरदस्ती केली जात असताना शाहरूख मुलाखत घेणाऱ्यांवर चांगलाच उखडला होता. ही घटना तेव्हाची आहे जेव्हा शाहरूख कतरिनाबरोबर ‘जब तक हैं जान’ या चित्रपटाचे प्रमोशन करत होता.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना शाहरूख खान म्हणाला,
जेव्हा आम्ही ‘जब तक हैं जान’चे प्रमोशन करत होतो तेव्हा आम्हाला एक पत्रकार भेटला ज्याचे वागणे अतिशय रुक्ष होते. कतरिना कैफ इंग्लीशमध्ये बोलत होती, तर तिने हिंदी बोलावे यावर जोर देत होता. जेव्हा मुलाखत संपली तेव्हा आम्ही चेष्टा मस्करीही करत होतो, परंतु नंतर त्याने ट्विट केले, शाहरूख खान स्वत:ला समजतो तरी कोण? त्याने मला २ तास प्रतिक्षा करायला लावली, परंतु एकटा लेट झालो नव्हतो. संपूर्ण टीमच लेट झाली होती.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर शाहरूख मागच्या वेळेस कतरिना आणि अनुष्का शर्मा यांच्याबरोबर ‘झीरो’ या चित्रपटात दिसून आला होता. आता तो आपल्या ‘पठाण’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. यात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम हे कलाकार पाहायला मिळणार आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …