कतरिनाला आपली प्रेरणा मानते पूनम पांडे

बॉलीवूड अभिनेत्री पूनम पांडे पुन्हा एकदा आपल्या खासगी आयुष्याविषयी केलेल्या विधानबाजीमुळे चर्चेत आली आहे. त्याचबरोबर तिने अभिनेत्री कतरिना कैफ आणि विक्की कौशलच्या विवाहाबद्दलही खूप मोठे मत मांडले आहे.
अलीकडेच पती सॅम बॉम्बेपासून वेगळी झालेली पूनम ही नेहमीच आपल्या बेधडक बोलण्याने चर्चेत असते. आताही एका वेबसाइटशी बोलताना पूनमने अभिनेत्री कतरिना कैफ हिला आपली प्रेरणा म्हटले आहे. ती पुढे म्हणाली की, पुढील किमान पाच वर्षे तरी तिला कुणाशी डेटिंग करण्याची इच्छा नाहीयं, परंतु तिला जर विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांच्या प्रेमकथेसारखा कुणी मिस्टर राइट मिळाला तर ती नक्कीच विचार करेल.

पूनमला जेव्हा तिच्या प्रेरणा स्थानाविषयी विचारणा करण्यात आली, तेव्हा तिने क्षणाचाही वेळ न दवडता कतरिनाचे नाव घेतले. कतरिनाचे भरभरून कौतुक करताना पूनम म्हणाली,’कतरिना कैफ जेथून आली आहे, त्यांनी तिला इतके मोठे बनवले आहे आणि प्रत्येकजण तिच्यावर प्रेम करतोय. माझीही इतकी मेहनत घेण्याची आणि तिच्याप्रमाणे पुढे जाण्याची इच्छा आहे आणि मला योग्य व्यक्तीशी लग्न करण्याची इच्छा आहे.
याआधी पूनम आपला पती सॅम बॉम्बेमुळे चर्चेत होती. गेल्या महिन्यात सॅमला पोलिसांनी अटक केली होती. सॅम बॉम्बेवर पूनम पांडेला मारहाण केल्याचा आरोप आहे. पूनमने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली होती. सॅमने पूनमला इतकी मारहाण केली होती की, तिच्यावर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली होती

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …