कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडला मिळेल पहिले मोठे आव्हान

दुबई – जेतेपदाचा प्रबळ दावेदार इंग्लंड संघाला सध्याच्या टी-२० विश्वचषकाच्या सामन्यात शनिवारी येथे सुपर-१२ मधील ग्रुप एकच्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरताच आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागेल.

दोन्ही संघ या सामन्यात प्रत्येकी दोन विजयासह उतरतील, अशात कठीण वाटणाऱ्या या गटात त्यांना आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी लढा द्यावा लागेल. ऑस्ट्रेलियाला विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकाविरुद्ध संघर्ष करावा लागले, पण संघाने गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध प्रभावशाली विजय नोंदवला. श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात सर्वात सकारात्मक गोष्ट अशी की, कर्णधार ॲरोन फिंच व डेव्हिड वॉर्नर ही सलामी जोडी लयात परतली. आक्रमक अर्धशतकाने संघाला विजय मिळवून देण्यास महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वॉर्नरच्या मते, इंग्लंडविरुद्धचा सामना कठोर असेल. वॉर्नर म्हणाला की, जाहीरपणे इंग्लंड एक असा संघ आहे, जो प्रत्येक विभागात चांगला खेळत आहे. त्यांची फलंदाजी फळी मोठी असून गोलंदाजीत अनेक पर्याय आहेत. इंग्लंडचा आत्मविश्वास खूप उंचावलेला आहे. ऑस्ट्रेलियासाठी जॉश हेजलवुड, मिशेल स्टार्क व पॅट कमिन्सच्या वेगवान गोलंदाजीच्या त्रिकुटासह लेग स्पिनर एडम झम्पा पूर्णपणे अपेक्षेनुसार खेळले. श्रीलंकेने या संघाविरुद्ध चांगली सुरुवात केली, पण झम्पाने मधल्या षटकात दोन विकेट घेत खेळाचा रंगच बदलला. त्यांच्यासाठी या विभागात चिंतेचे एकमेव कारण ग्लेन मॅक्सवेल व मार्क स स्टोइनिसच्या गोलंदाजी कामगिरीवर असेल, ज्यांनी गुरुवारी ४ षटकांत ५१ धावा दिल्या. दुसरीकडे, इंग्लंड, वेस्ट इंडीज व बांगलादेशवर मोठा विजय मिळवत हा सामना खेळतील. या दोन्ही सामन्यात त्यांना जास्त घाम गाळावा लागला नाही. दरम्यान, ऑस्ट्रेलियाकडून त्यांना कठोर आव्हान मिळण्याची शक्यता आहे. या दोन्ही सामन्यात गोलंदाजीची सुरुवात करणारा ऑफ स्पिनर मोईन अली प्रभावशाली राहिला व त्याने स्पर्धेत ४ विकेट मिळवलेत. वेगवान गोलंदाज टाइमल मिल्सने प्रभावित केले व अखेरच्या षटकात तो चांगली गोलंदाजी करतोय. लेग स्पिनर आदिल राशिद बांगलादेशविरुद्ध चांगली गोलंदाजी करू शकला नव्हता, पण अपेक्षा आहे की, तो शनिवारी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना अडचणीत आणेल. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर वॉर्नर म्हणालेला की, दुसऱ्या डावात जास्त दवबिंदू पडले नव्हते, पण आतापर्यंत अनेक संघ लक्ष्याचा पाठलाग करताना पहिली पसंती देताना दिसतात. हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …