कच्च्या तेलाचे दर पुन्हा घसरले; भारतात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर

नवी दिल्ली – सामान्य नागरिकांची डोकेदुखी ठरलेल्या कच्चा तेलाच्या किमतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार पाहण्यास मिळत आहे. आनंदाची बातमी अशी की, बुधवारी पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या. कच्च्या तेलाचे भाव तब्बल प्रति बॅरल ५ डॉलरने कमी झाले होते, म्हणजेच ८५ डॉलर प्रती बॅलरवरून दर थेट ८० डॉलर प्रति बॅरलवर पोहचलेत. कोरोनानंतर कच्च्या तेलाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले असले, तरी त्या तुलनेत मागणी कमी असल्याने तेलाच्या दरात घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घसरण होत असताना, देशत पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याची अपेक्षा होती; मात्र दर स्थिर असल्याचे पाहण्यास मिळाले.

या सर्व परिस्थितीत राजस्थान सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कपातीचा निर्णय घेतला असून, त्यामुळे राजस्थानमध्ये पेट्रोल ४ रुपयांनी, तर डिझेल ५ रुपयांनी स्वस्त झाले आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहेत. यापूर्वी पंजाब आणि उत्तर प्रदेश सरकारने देखील पेट्रोल, डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला होता. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे प्रचंड वाढल्याने, जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्राने उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार देशात पेट्रोल ५ रुपयांनी, तर डिझेल १० रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यानंतर राज्यांनी देखील पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी कराव्यात, असे आवाहन केंद्राकडून करण्यात आले होते. केंद्राच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक राज्यांनी पेट्रोल, डिझेलचे दर कमी केले आहेत. यामध्ये पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान अशा मोठ्या राज्यांचा समावेश आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …