कंगनाने शेअर केला टीकू वेड्स शेरूचा फर्स्ट लूक

अलीकडेच बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने आपले प्रोडक्शन हाऊस मणिकर्णिका फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत तयार होत असलेल्या टीकू वेड्स शेरूचे शूटिंग सुरू करत असल्याची घोषणा केली होती. आता या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर लीड रोलमध्ये दिसून येणार आहेत.

कंगनाने सोशल मीडियावर नवाजुद्दीन आणि अवनीत कौरच्या फर्स्ट लूकसह चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. कंगनाने पोस्टर शेअर करताना लिहिले आहे, ‘ज्या दिवशी मी आपला पद्यश्री सन्मान घेत आहे, त्याच दिवसापासून माझा निर्माती म्हणून प्रवास सुरू होत आहे. आपले प्रोडक्शन मणिकर्णिका फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरअंतर्गत तयार होत असलेला टीकू वेड्स शेरूचा फर्स्ट लूक सर्वात आधी आपल्याबरोबर शेअर करत आहे. हा आहे माझ्या हृदयाचा तुकडा. आशा आहे आपल्याला पसंत पडेल. शूटिंग सुरू झाले आहे. लवकरच आपली थिएटर्समध्ये भेट होईल.’
कंगना व्यतिरिक्त या चित्रपटाचा फर्स्ट लूक नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौरनेही सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा चित्रपट साई कबीर दिग्दर्शित करत आहेत. कबीर यांनी यापूर्वी कंगनाचा रिव्हॉल्व्हर रानी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होईल असा अंदाज आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …