कंगनाची याचिका फेटाळली

मुंबई – गीतकार जावेद अख्तर यांनी आपल्याविरोधात दाखल केलेला फौजदारी अवमानना खटला अन्यत्र वर्ग करण्याची मागणी करीत बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने दाखल केलेली याचिका गुरुवारी येथील एका न्यायालयाने फेटाळून लावली. कंगनाने गेल्या महिन्यात मुख्य महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांकडे ही याचिका दाखल केली होती. आपल्याविरोधातील दाव्याची सुनावणी करीत असलेल्या महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयावरील आपला विश्वास उडाला असल्याचे कंगनाने आपल्या याचिकेत म्हटले होते. जामीनपात्र असलेल्या या गुन्ह्यात आपण दंडाधिकारी न्यायालयात उपस्थित राहिलो नाही, तर आपल्याविरोधात वॉरंट बजावले जाईल अशी अप्रत्यक्ष धमकी दंडाधिकारी न्यायालयाने आपल्याला दिल्याचे तिने याचिके त नमूद केले होते. जावेद अख्तर यांनी या याचिकेला विरोध केला होता. अंधेरी येथील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयातील कामकाजाला विलंब करण्याच्या इराद्यानेच कंगनाने ही याचिका दाखल केली असल्याचा आरोप जावेद अख्तर यांनी केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने कंगनाची याचिका फेटाळून लावली. सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (७६) यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कंगनाविरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली होती. कंगनाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने आपल्याविरोधात अवमानकारक विधाने केली होती. त्यामुळे आपल्या प्रतिष्ठेला धक्का बसला असल्याचा दावा त्यांनी केला होता.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *