ठळक बातम्या

कंगनाचा ‘पद्मश्री’ पुरस्कार काढून घ्या – नवाब मलिक

मुंबई – अभिनेत्री कंगना राणावतने स्वातंत्र्याबद्दल केलेल्या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी निषेध नोंदवला आहे. लगता है मोहतरमा मलाणा क्रिम लेकर ज्यादा बोल रही है, ओव्हर डोस ज्यादाही हो गया है, असे सांगतानाच कंगनाचा ‘पद्मश्री’ पुरस्कार काढून घ्यावा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. नवाब मलिक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. १८५७ पासून या देशात स्वातंत्र्याचे आंदोलन सुरू झाले. त्यानंतर लाखो लोकांनी प्राणाची आहुती दिली. गांधीजींनी मोठा लढा दिला. शेवटी ब्रिटिशांनी आपल्याला स्वातंत्र्य दिले. त्यानंतर एक अभिनेत्री मलाणा क्रिम घेऊन ओव्हर डोस झाल्यावर काही तरी बोलत आहे. त्यामुळे तिचा ‘पद्मश्री’ पुरस्कार मागे घेतला जावा. या अभिनेत्रीने कोट्यवधी भारतवासियांचा अपमान केला असल्याचे सांगून तिच्यावर गुन्हा दाखल करावा व तिला अटक करावी, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली.
यावेळी त्यांनी एसटी कामगारांना संप मागे घेण्याचे आवाहन केले. एसटी कामगार संप करीत आहेत. त्यांच्या काही मागण्या आहेत. त्यावर तोडगा काढण्याचे काम संबंधित खात्याचे मंत्री करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणात लक्ष घातले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर लवकर तोडगा निघेल अशी आशा आहे, असे त्यांनी सांगितले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …