औरंगाबाद – राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कंबर कसली असून, ते राज्यातील विविध भागांचा दौरा करणार आहेत. पण राज यांच्या औरंगाबाद दौऱ्यापूर्वी शिवसेनेने मनसेला एक धक्का दिला आहे. मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवबंधन हाती बांधले आहे. राज ठाकरे हे पुढील आठवड्यात औरंगाबादचा दौरा करणार आहेत, मात्र त्यापूर्वीच शिवसेनेने मनसेला धक्का दिला. पालकमंत्री सुभाष देसाई हे औरंगाबाद दौऱ्यावर असताना मनसेतील स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी मनसे पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतल्याने मनसेला हा एक मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. औरंगाबाद मनपाच्या निवडणुका काही दिवसांवर आहेत. या निवडणुकीपूर्वीच शिवसेनेने खेळी खेळत मनसे पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना गळाला लावले. त्यामुळे याचा परिणाम मनसेच्या मतांवर होईल, असे बोलले जात आहे. दुसरीकडे, राज ठाकरे १४ डिसेंबरपासून मराठवाड्याचा दौरा करतील आणि मग पुन्हा १६ डिसेंबर रोजी पुण्यात राज ठाकरे एक बैठक घेणार आहेत.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …