ठळक बातम्या

औरंगाबादमध्ये कोरोना उपचाराचा फ्रॉड

  • पॉझिटिव्ह नसलेले हॉस्पिटलमध्ये दाखल
  • ६ जणांवर गुन्हा

औरंगाबाद – औरंगाबादमध्ये कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या ऐवजी दुसरेच बनावट रुग्ण उपचारासाठी महापालिकेच्या मेल्ट्रॉन रुग्णालयात दाखल झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या धक्कादायक प्रकरणानंतर औरंगाबादमध्ये एकच खळबळ उडाली. औरंगाबाद महानगरपालिकेच्या तक्रारीनंतर ६ जणांविरोधात सिडको पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेले २ रुग्ण, त्यांच्या जागी उपचार घेण्यासाठी आलेले २ तरुण आणि याप्रकरणी मध्यस्थी करणारे २ अशा ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१० दिवसांचे १० हजार मिळणार, शिवाय खा-प्या आणि मजा करा. अशी मध्यस्थाने रुग्णांची जागा घेणाऱ्यांना ऑफर दिली होती. यासाठी जालन्यातील २ तरुण तयार झाले. ते तरुण जालन्याहून औरंगाबादेत पोहोचले आणि थेट कोविड पॉझिटिव्ह रुग्णांसोबत उपचार घेऊ लागले; पण नंतर ही बाब आरोग्य आधिकाऱ्याच्या लक्षात आली. पोलिसांनी रुग्णालयाच्या तक्रारीनंतर बनावट रुग्णांना ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू आहे. या सगळ्या प्रकरणात सखोल चौकशीअंती पॉझिटिव्ह रुग्ण आणि उपचारासाठी आलेल्या बनावट रुग्णांमध्ये २ मध्यस्थ असल्याचे समोर आले. औरंगाबाद पोलिसांनी या ६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मध्यस्थ असल्याने यात अशाप्रकारे गुन्हे करण्याचे रॅकेट सक्रिय आहे का? हेदेखील तपासले जाणार असल्याचे सिडको एमआयडीसी पीआय विठ्ठल पोटे यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार जे बनावट रुग्ण उपचारासाठी आले होते, त्यांच्याकडे येतानाच एका खासगी रुग्णालयात रेफर सर्टिफिकेट होते. त्यामुळे इन्शुरन्ससाठी तर हे सगळं सुरू नव्हतं ना? याचाही पोलीस तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ उद्यानासमोर शनिवारी सकाळी उस्मानपुऱ्यातील गगन पगारे व म्हाडा कॉलनीतील गौरव काथार यांची अँटिजन टेस्ट झाली. दोघे पॉझिटिव्ह निघाले, मात्र त्यांनी तळणी (जि. जालना) येथील अलोक राठोड व अतुल सदावर्ते यांना मेल्ट्रॉन रुग्णालयात दाखल केले. हे दोघेही बीएससीचे विद्यार्थी आहेत. त्यांना सिडको परिसरातील विजय मापारी, साबळे यांनी शनिवारी दुपारी साडेतीन वाजता मेल्ट्रॉनमध्ये आणले होते. दरम्यान, आपण कोविड रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या नावाने भरती झालो आहोत, हे कळल्यावर दोन्ही डमी रुग्णांचा गोंधळ उडाला. त्यांनी डिस्चार्ज करण्यासाठी तगादा लावला. त्यामुळे मेल्ट्रॉनच्या डॉ. वैशाली मुदगडकर यांना शंका आली. त्यांनी अधिक चौकशी केली असता सर्व प्रकार समोर आला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …