नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्र सरकारने शनिवारी कोरोना व्हायरसच्या नवीन ओमिक्रॉन प्रकाराच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन बैठक बोलावली होती. रविवारी केंद्र सरकारच्या आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना नवीन गाइडलाइन्स आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांबाबत घ्यावयाची खबरदारी असलेले पत्र जारी केले आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर, विशेषत: ‘हाय रिस्क’ देशांतील प्रवाशांवर कठोर पाळत ठेवणे, नियमित तपासणी, कोविड चाचणी, त्यांच्या मागील प्रवासाच्या नोंदी आणि त्यांचे नमुने त्वरित जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवणे, अशा सूचना सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना दिल्या गेल्या आहेत.
पत्रात राज्यांना कोविड चाचणी पायाभूत सुविधा वाढवण्यासही सांगण्यात आले आहे. त्यामुळे नवीन कोविड विषाणूची कोणतीही लाट असल्यास, सुधारित चाचणी केंद्रे कार्यरत असावीत. काही राज्यांमध्ये आरटी-पीसीआर चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याचे आढळून आले आहे. पुरेशी चाचणी नसल्यास, संसर्ग पसरण्याची खरी पातळी निश्चित करणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे राज्यांनी चाचण्यांच्या पायाभूत सुविधा मजबूत कराव्या आणि मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
ज्या भागात अलीकडील पॉझिटिव्ह केसेस जास्त आहेत, त्या हॉटस्पॉट्सचे सतत निरीक्षण करणे, सर्व हॉटस्पॉट्समध्ये चाचण्या करून पॉझिटिव्ह नमुने नियुक्त प्रयोगशाळांमध्ये जीनोम सिक्वेन्सिंगसाठी त्वरित पाठवण्याचे आदेश दिले गेले आहेत. या प्रयोगशाळा भारत सरकारच्या जैव-तंत्रज्ञान विभाग आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या अंतर्गत आहेत. कुठल्याही हॉटस्पॉट्सला लगेच कंटेन्मेंट झोन म्हणून निर्धारित करण्याच्याही सूचना आहेत. केंद्र सरकारच्या पत्रात असेही म्हटले आहे की, राज्य सरकारने उपचारासाठी पुरेशा वैद्यकीय सुविधा तयार कराव्यात, ज्या संपूर्ण राज्य क्षेत्रामध्ये आणि विशिष्ट ठिकाणी केंद्रित केल्या जाऊ नयेत. दरम्यान, जवळपास सर्व राज्यांनी नवीन कोविड प्रकाराबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …