नवी दिल्ली – कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमिक्रॉनमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या व्हेरिएंटवर सध्याच्या लसी प्रभावी ठरतील की नाही, येथेपासून ते तिसºया लाटेचे संकट येईल का? आणि आले तर ओमिक्रॉनमुळेच येईल का?, येथेपर्यंत सर्व बाबतीत दावे केले जात आहेत. ओमिक्रॉन व्हेरिएंट सापडल्यामुळे तिसºया लाटेविषयी पुन्हा दावे केले जात आहेत. तिसरी लाट तयार करण्याचे सर्व गुणधर्म ओमिक्रॉनमध्ये असल्याचा दावा सीएसआयआरचे संचालक डॉ. अनुराग अग्रवाल यांनी केला आहे.
जर आपण कोविड-१९च्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा अभ्यास केला, तर तिसरी लाट तयार करू शकणाºया व्हेरिएंटचे सर्व गुणधर्म त्याच्यात आहेत. मानवी प्रतिकारशक्तीला तो बेमालूमपणे चकवा देऊ शकतो हे समोर आलेल्या अभ्यासातून दिसून आले आहे, असे डॉ. अग्रवाल म्हणाले. दरम्यान, डॉ. अग्रवाल यांनी तिसºया लाटेची शक्यता व्यक्त केली आहे. आपण सर्वच विचार करतो आहे, त्याप्रमाणे तिसरी लाट नक्कीच येईल, पण ही लाट कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याच्या स्वरूपात दिसून येईल, पण ती जीवघेणी नसेल. आपल्या आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण करण्याइतपत तिचे स्वरूप मोठे नसेल, असे डॉ. अग्रवाल म्हणाले आहेत.
सध्या सर्वात चांगली इम्युनिटी कोणती असेल, तर ती हायब्रिड इम्युनिटी आहे. भारतातील सर्वाधिक लोकसंख्येमध्ये हायब्रिड इम्युनिटी आहे. तुम्हाला जर आधी कोरोनाची लागण होऊन गेल्यानंतर एखादा जरी लसीचा डोस दिला गेला असेल, तर तुमच्यात ती हायब्रिड इम्युनिटी तयार होते, असेदेखील डॉ. अग्रवाल यांनी नमूद केले आहे. सुरुवातीच्या काळात लसीकरण झालेल्या आरोग्य कर्मचाºयांची जास्त काळजी घ्यावी लागेल, असे अग्रवाल म्हणाले आहेत. अद्याप लसच घेतली नसलेल्यांची प्रतिकारशक्ती सर्वात कमकुवत असेल, पण दुसºया लाटेच्याही आधी लसीकरण झालेल्या आरोग्य कर्मचाºयांची विशेष काळजी घ्यावी लागेल. त्यांना पुन्हा कोरोनाची बाधा होऊ शकते. त्यासाठी बूस्टर डोससारख्या पर्यायाचा विचार करायला हवा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.