ओमिक्रॉनमुळे जुळले नाते

परफेक्ट जोडीदाराच्या शोधात लोक वैवाहिक जाहिरातीपासून ते डेटिंग अ‍ॅपपर्यंत मदत घेतात, पण मुलगा-मुलीचे नाते जुळवण्याचे काम कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमिक्रॉनने केले, असे म्हटल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. असाच काहीसा प्रकार आॅस्ट्रेलियातील एका मुलीसोबत घडला आहे. या मुलीने टिंडर या डेटिंग अ‍ॅपद्वारे स्वत:साठी मुलगा निवडला होता. ते अधिकृत नातेसंबंधात आले नाहीत, परंतु एकमेकांमध्ये पुढील आयुष्याची शक्यता शोधत होते. दरम्यान, तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. मग काय, मुलीने डेटिंग पार्टनरला तिच्यासोबत एकटे राहण्याची आॅफर दिली आणि मुलगा लगेच तयार झाला.
न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, मुलीने तिची कहाणी टिकटॉकवर शेअर करताना सांगितले आहे की, दोघेही एकत्र घरात नक्कीच वेगळे आहेत, पण ते अधिकृत रिलेशनशीपमध्ये आलेले नाहीत. सारा असे या मुलीचे नाव असून, कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या दोघांना कसे वेगळे केले गेले हे तिने सांगितले आहे. साराने तिच्या टिकटॉक अकाऊंटवर एका व्हिडीओद्वारे तिच्या डेटिंग पार्टनरसोबतचा अनुभव शेअर केला आहे. कोरोना रिपोर्ट शेअर करताना तिने सांगितले की, आम्ही एकत्र चांगला वेळ घालवत आहोत. एकत्र खेळ खेळत आहोत आणि भरपूर कपडेही धुवत आहोत.

साराचा हा व्हिडीओ आतापर्यंत ३० लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. यावर लोकांनी आपापल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. मुलीने ती रिलेशनशीपमध्ये नसल्याचे सांगितल्यामुळे एका यूझरने लिहिले – ही ७ दिवसांची फ्री रिलेशनशीप ट्रायल आहे का? आणखी एका यूझरने लिहिले की, हे रोमान्सचे नवे युग आहे. ही टिंडर कथा पाहून बहुतेक वापरकर्त्यांनी सहमती दर्शवली की, मुलगा तिच्याबरोबर राहण्यास योग्य आहे की नाही हे आता मुलीला समजेल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …