ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्यामुळे पुण्यात पुन्हा निर्बंध कडक

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला फटका
तीन दिवसांत बदलले आदेश

पुणे – शहरातील नाट्यगृहे, चित्रपटगृहांची आसनक्षमता १ डिसेंबरपासून १०० टक्के सुरू होईल, तसेच सवाई गंधर्व महोत्सवास परवानगी देण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांनी घेतला होता, मात्र राज्य शासनाचे नवे आदेश महापालिकेला प्राप्त झाले असून, चित्रपटगृहे आणि नाट्यगृहांमध्ये पूर्वीप्रमाणे ५० टक्के प्रेक्षकांना प्रवेश दिले जाणार आहेत. खुल्या जागेतील कार्यक्रमासाठी २५ टक्के उपस्थितीची परवानगी आहे. त्यामुळे बंधन शिथिल केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी हे नवे आदेश सोमवारी काढले आहेत.
पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारच्या आढावा बैठकीमध्ये मनोरंजन व सांस्कृतिक क्षेत्राला दिलासा दिला होता, पण ही बैठक होताच काही वेळातच राज्य शासनाने नवे आदेश जाहीर केले. त्यामध्ये ५० टक्केच परवानगी असल्याने महापालिका काय निर्णय घेणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता, परंतु आता दिलासा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्यास स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास कोरोनाचे निर्बंध, शर्ती वाढविण्याचे अधिकार दिले आहेत. यासाठी ४८ तास आधी पूर्व सूचना देणे बंधनकारक आहे.

पुण्यात तीन दिवसांतच पुन्हा निर्बंध कडक करण्यात आले आहेत. ओमिक्रॉममुळे पुन्हा एकदा पुण्यातील निर्बंध कडक करण्यात आले आहेत. महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सोमवारी रात्री नव्याने हे आदेश काढले आहेत. चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मंगल कार्यालय, सभागृह यांसह इतर बंदिस्त जागेतील कोणत्याही कार्यक्रमासाठी जागेच्या क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीसाठी परवानगी देण्यात आली आहे.
ओमिक्रॉमच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नव्याने लावण्यात आलेल्या निर्बंधांचा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला फटका बसणार आहे. येत्या २ डिसेंबरपासून पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात होत आहे. याबरोबरच खुल्या जागेतील कार्यक्रमासाठी १ हजारपेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहाणार असतील, तर त्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास द्यावी लागणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. याबरोबरच संपूर्ण खुल्या जागेत कोणताही समारंभ, संमेलनाला तेथील जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के लोकांच्या उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे.

About Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …