‘ओमिक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर होम आयसोलेशनसाठी नवी नियमावली

नवी दिल्ली – कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालय लवकरच अनेक नियम बदलणार आहे. त्यात सर्वात मोठा बदल होम आयसोलेशनच्या मार्गदर्शक तत्वात झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तो जारी केला आहे. आरोग्य मंत्रालयाने सौम्य लक्षण असलेल्या किंवा लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांच्या होम आयसोलेशनसाठी सुधारित मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. सात दिवस पॉझिटिव्ह राहिल्यानंतर आणि तीन दिवस ताप नसेल, तर रुग्णाला होम आयसोलेशनच्या नवीन नियमांनुसार डिस्चार्ज दिला जाईल आणि अलगीकरण संपेल, असे मंत्रालयाने म्हटले आहे. आरोग्य मंत्रालयानं म्हटले आहे की, होम आयसोलेशनचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा चाचणी करण्याची आवश्यकता नाही.
भारतात कोमॉर्बिड रुग्णांची संख्या (जे आधीच काही आजाराशी झुंज देत आहेत) लक्षणीय आहे. अशा परिस्थितीत रुग्णांची संख्या वाढल्यास रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही वाढेल. होम आयसोलेशनच्या नवीन मार्गदर्शक तत्वाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी, राज्यांना नियंत्रण कक्ष व्यवस्थित ठेवण्यास सांगितले गेले आहे.
वृद्ध रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होम आयसोलेशनची परवानगी दिली जाईल. सौम्य लक्षणे असलेले रुग्ण घरीच राहतील. यासाठी योग्य व्हेंटिलेशन असणे आवश्यक आहे. रुग्णाला ट्रिपल लेयर मास्क घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय रुग्णाला जास्तीत जास्त द्रवपदार्थ घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याचवेळी एचआयव्ही बाधित किंवा प्रत्यारोपण झालेल्या आणि कर्करोगाच्या रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच होम आयसोलेशनमध्ये जाण्याची परवानगी दिली जाईल.
लक्षणे नसलेले आणि सौम्य-लक्षण असलेले रुग्ण ज्यांची ऑक्सिजन पातळी ९३ टक्क्यांपेक्षा जास्त आहे, त्यांना होम आयसोलेशनमध्ये जाण्याची परवानगी दिली जाईल. जिल्हा स्तरावरील नियंत्रण कक्षाला होम आयसोलेशनमध्ये असलेल्या सौम्य लक्षणे असलेल्या आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या सतत संपर्कात रहावे लागेल. नियंत्रण कक्ष त्यांना आवश्यक असल्यास वेळेवर चाचणी आणि रुग्णालयातील बेड प्रदान करण्यास सक्षम असेल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …