ओमिक्रॉनची लाट, म्हणजे विझणाऱ्या दिव्याची फडफड – शास्त्रज्ञांचा नवा दावा

नवी दिल्ली – जगभरात पुन्हा एकदा कोरोना महामारीचे थैमान सुरू आहे. कोरोनाच्या या लाटेला ओमिक्रॉनचे नाव देण्यात आले आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे कोरोना बाधितांची संख्या उच्चांक गाठत असताना दुसरीकडे शास्त्रज्ञांनी मोठा दिलासा दिला आहे. ओमिक्रॉनमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या मात्र कमी असल्याचे समोर आले आहे. कोरोनाची चिंता कमी करणारी ही बाब असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी आता केला आहे.

कॅलिफोर्निया विद्यापीठातील रोगप्रतिकारकशास्त्रज्ञ डॉ. मोनिका गांधी या म्हणतात की, आपण सध्या पूर्णपणे वेगळ्या टप्प्यात आहोत. विषाणू हा नेहमीच आपल्यासोबत असतो, मात्र या व्हेरिएंटमुळे लोकांमधील रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होईल आणि त्यामुळे महामारी आटोक्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एक ते दोन महिन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळला होता. त्यानंतर शास्त्रज्ञांनी काळजी घेण्याचे आवाहन केले होते, मात्र मागील आठवड्यात हाती आलेल्या डेटानुसार, वाढलेली रोगप्रतिकारशक्ती आणि विषाणूचे झालेले म्युटेशन यांमुळे आजाराचे स्वरूप गंभीर झाले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेतील एका अभ्यासानुसार, कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या लाटेदरम्यान रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांपैकी ओमिक्रॉनबाधितांची प्रकृती गंभीर होण्याची शक्यता ७३ टक्क्यांनी असल्याचे आढळून आले. केपटाऊन विद्यापीठाच्या इम्युनोलॉजिस्ट वेंडी बर्गर्स यांनी म्हटले की, कोरोनाबाधितांची संख्या आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या वाढल्याने हा डेटा ठोस असल्याचे आपण म्हणू शकतो. कोरोनाच्या यापूर्वी आलेल्या लाटांच्या तुलनेत अनेक घटकांमुळे ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे कमी गंभीर असल्या मागे काही घटक कारणीभूत असल्याचा दावा करण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग सामान्यत: नाकातून सुरू होतो आणि घशात पसरतो. सौम्य संसर्गामुळे ते श्वसनमार्गापेक्षा जास्त दूर जात नाही, परंतु जर विषाणू फुफ्फुसात पोहोचला, तर अधिक गंभीर लक्षणे उद्भवतात. मात्र, काही संशोधनानुसार ओमिक्रॉन व्हेरिएंटचा फुफ्फुसात सहजपणे संसर्ग होत नसल्याचे समोर आले आहे.
हाँगकाँगमध्ये, शास्त्रज्ञांनी एका शस्त्रक्रियेच्या दरम्यान, ओमिक्रॉन बाधितांच्या फुफ्फुसाच्या ऊतींचे नमुने अभ्यासले होते. त्या नमुन्यानुसार ओमिक्रॉनची वाढ ही इतर व्हेरिएंटपेक्षा कमी असल्याचे समोर आले. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या डॉ. मोनिका गांधी यांनी म्हटले की, ओमिक्रॉनमुळे बाधितांची संख्या उच्चांक गाठू शकते. मात्र, या व्हेरिएंटची असलेली सौम्य लक्षणे ही संसर्गाच्या शेवटाची सुरुवात असू शकते, असेही त्यांनी म्हटले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …