ओमिक्रॉनचा संसर्ग फेब्रुवारीमध्ये गाठणार उच्चांक / अभ्यासातून समोर आली माहिती

Medical illustration. 3D rendering

नवी दिल्ली – कोरोनाचा नव्या व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या प्रादुभार्वामुळे सध्या जगभरात चिंतेचे वातावरण आहे. लवकरच या व्हेरिएंटमुळे कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. फेब्रुवारी महिन्यात ही तिसरी लाट उच्चांक गाठू शकते, असा इशारा आयआयटीमधल्या अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

कोरोना विषाणूसंदर्भातला अभ्यास करणारे आयआयटीमधले शास्त्रज्ञ मणिंद्र अग्रवाल यांनी हा अंदाज वर्तवला आहे. मात्र ओमिक्रॉनमुळे येणारी ही तिसरी लाट दुसºया लाटेपेक्षा सौम्य स्वरूपाची असेल, असा अंदाज अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे. अग्रवाल म्हणाले, ओमिक्रॉनच्या अनुषंगाने आमचा सध्याचा अंदाज असा आहे की, देशात फेब्रुवारीपर्यंत तिसरी लाट दिसू शकते, परंतु ती दुसºया लहरीपेक्षा सौम्य असेल. आतापर्यंत आपण पाहिले आहे की ओमिक्रॉनची तीव्रता डेल्टा व्हेरिएंटइतकी नाही.
ओमिक्रॉनचा उगम जिथे झाला त्या दक्षिण आफ्रिकेतील रुग्णसंख्या तसेच संसर्गावर नीट लक्ष ठेवून त्याचा अभ्यास केला जाईल. दक्षिण आफ्रिकेत रुग्णालयात दाखल होणाºया रुग्णांच्या संख्येत अद्यापही वाढ नोंदवण्यात आलेली नाही. ज्यावेळी रुग्णसंख्या आणि रुग्णालयात दाखल होणाºयांच्या संख्येविषयीची अधिक माहिती मिळेल, त्यावेळी अधिक ठामपणे निष्कर्ष काढता येईल, असेही अग्रवाल म्हणाले. नव्या व्हेरिएंटचा प्रसार वेगाने होत असला तरी त्याची तीव्रता डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे मागच्या दोन लाटांप्रमाणेच सौम्य लॉकडाऊन, गर्दीवर निर्बंध, रात्रीची संचारबंदी अशा प्रकारचे उपाय करून विषाणूसंसर्गाला उच्चांक गाठण्यापासून रोखता येईल, असेही अग्रवाल म्हणाले.

About Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …