ओमिक्रॉनचा प्रभाव सौम्य होतोय – रणदीप गुलेरिया

नवी दिल्ली – ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी एक दिलासादायक माहिती दिली आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रभाव सौम्य होत आहे. घाबरू नका, असे त्यांनी सांगितले. गुलेरिया यांनी माहिती देताना सांगितले की, अत्यंत संसर्गजन्य ओमिक्रॉन व्हेरिएंट मुख्यत्वे वरच्या श्वसनमार्गावर आणि वायुमार्गांवर परिणाम करतात. फुफ्फुसांवर याचा अधिक संसर्ग होत नाही. त्यामुळे ज्यांना ब्लड प्रेशर, मधुमेह किंवा इतर आजार नाहीत त्यांनी घाबरून जाऊ नये आणि हॉस्पिटलच्या बेड्स ब्लॉक करू नयेत. गुलेरिया यांनी पुढे सांगितले की, गृह विलगीकरणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. ओमिक्रॉनचा फुफ्फुसांऐवजी वरच्या श्वसनमार्गावर परिणाम होत आहे, म्हणूनच ऑक्सिजन कमी झालेले किंवा डेल्टामध्ये समोर आली त्या प्रकारची इतर गंभीर लक्षणे असलेले रुग्ण खूप कमी दिसतात. ताप, सर्दी, घसा खवखवणे आणि खूप अंगदुखी आणि डोकेदुखी ही लक्षणे ओमिक्रॉनमध्ये प्रामुख्याने आढळतात. यापैकी कोणतीही लक्षणे कायम राहिल्यास संशयित रुग्णांनी स्वत:ची तपासणी करून घ्यावी आणि विलगीकरणात रहावे. अशाप्रकारे समाजातील इतर लोकांमध्ये संसर्ग पसरण्यापासून रोखू शकतात.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …