ठळक बातम्या

ओमिक्रॉनचा धोका तरुणांना – तज्ज्ञांचा इशारा

Medical illustration. 3D rendering

नवी दिल्ली – कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या प्रकाराने पुन्हा एकदा जगात खळबळ उडवून दिली आहे. २९ हून अधिक देशांमध्ये त्याच्या प्रकरणांची पुष्टी झाली आहे. या नवीन प्रकाराच्या बाबतीत, दक्षिण आफ्रिकेचे शास्त्रज्ञ म्हणतात की, ओमिक्रॉन किती प्राणघातक आहे आणि त्याचा लोकांवर काय परिणाम होईल, हे तूर्तास सांगणे कठीण आहे. ते म्हणाले की, कोरोनाच्या नवीन प्रकाराचा आतापर्यंत बहुतांश तरुणांवर परिणाम झाला आहे. तज्ज्ञांनी अशीही चेतावणी दिली आहे की, ओमिक्रॉनमुळे फक्त सौम्य आजार होईल की नाही, हे सांगणे खूप घाईचे ठरेल. याबाबत अधिक माहिती गोळा करत असून, दोन ते तीन आठवड्यांनंतरच याबद्दल अधिक माहिती मिळेल.

तज्ज्ञांच्या मते काही रुग्णांना दाखल करण्यात आले असून, ते सर्व तरुण आहेत, ज्यांचे वय ४० किंवा त्यापेक्षा कमी आहे. दुसरीकडे, एनआयसीडीमधील सार्वजनिक आरोग्य देखरेख आणि प्रतिसाद प्रमुख मिशेल ग्रोम म्हणतात की, कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ओमिक्रॉनचे बहुतेक बळी तरुण लोक आहेत, परंतु आम्ही वृद्ध वयोगटांमध्येही याची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. तत्पूर्वी, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसीजेसने सांगितले की, दक्षिण आफ्रिकेतील नवीन प्रकरणांची संख्या गेल्या २४ तासांत जवळपास दुप्पट होऊन ८,५६१ झाली आहे. ओमिक्रॉन हे आतापर्यंत देशातील प्रबळ स्ट्रेन आहे. दक्षिण आफ्रिकेचे सरकार आणि शास्त्रज्ञांनी २५ नोव्हेंबर रोजी कोरोनाचे नवीन प्रकार जाहीर केले. यानंतर डब्ल्यूएचओने त्याचे नाव ओमिक्रॉन ठेवले. नवीन प्रकार आढळल्यानंतर, यूएस, युरोपियन युनियन, कॅनडा, इस्रायल, आॅस्ट्रेलिया आणि इतर देशांनी दक्षिण आफ्रिकन देशांच्या प्रवासावर बंदी घातली. त्याचवेळी काही देशांनी दक्षिण आफ्रिकेतून येणाºया विमानांवर बंदी घातली आहे.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …