ओमायक्रॉन’ ने भारताची चिंता वाढवली

१२ देशांतील प्रवाशांसाठी ‘ स्क्रिनिंग’ अनिवार्य
नवी दिल्ली – ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने जगातील इतर देशांसह भारताची चिंता वाढवली आहे. कोरोनाच्या या घातक व्हेरिएंटला थांबवण्यासाठी भारत सरकारने दक्षिण आफ्रिका, ब्रिटन, हाँगकाँग आणि बोत्सवानासह १२ देशांची नावे जाहीर केली आहेत. या देशातून येणाºया विमान प्रवाशांची तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे.

बाहेरून येणाºया या सर्व प्रवाशांना भारत सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. यापूर्वी आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने नोंदवल्यानुसार तीन देशांमध्ये कोरोना व्हेरिएंट बी.१.१ ची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. बोत्सवानामध्ये तीन, दक्षिण आफ्रिकेत सहा आणि हाँगकाँगमध्ये एक नवीन व्हेरिएंटची उदाहरणे समोर आली आहेत.
ज्या १२ देशांमधून भारतात येणाºया प्रवाशांसाठी स्क्रिनिंग अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामध्ये दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांगलादेश, बोत्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, सिंगापूर, इस्रायल, हाँगकाँग, यूके या युरोपातील देशांचा समावेश आहे.

About Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …