ओबीसी आरक्षण : कमी कालावधीत इम्पेरिकल डेटा गोळा करणे अशक्य

  • राज्य सरकारचा युक्तिवाद
  • सुप्रीम कोर्टातली सुनावणी पुन्हा लांबणीवर

नवी दिल्ली – ओबीसी आरक्षणासंदर्भातील सुनावणी आता आज बुधवारी होणार आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा अध्यादेश सुप्रीम कोर्टाने स्थगित केल्यानंतर राज्य सरकारच्या वतीने हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार होती. यासंदर्भात मंगळवारी राज्य सरकारने आपली बाजू कोर्टात मांडली. ओबीसी आरक्षणासाठी कमी कालावधीत इम्पेरिकल डेटा गोळा करणं शक्य नाही, असं राज्य सरकारने म्हटलं आहे. आता यावर आज बुधवारी कोर्टात सुनावणी होणार आहे.

एवढ्या कमी कालावधीत इम्पेरिकल डेटा गोळा करणे शक्य नाही, डेटा गोळा करण्यासाठी काही वेळ लागणार असून, केंद्र सरकारने इम्पेरिकल डेटा उपलब्ध करून द्यावा, असा युक्तिवाद राज्य सरकारने कोर्टात केला आहे. यावर पुन्हा युक्तिवाद केला जाणार आहे.
यावर छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, हा तातडीचा मुद्दा आहे, निवडणुका पुढे ढकला किंवा एकत्र घ्या, याबाबतच्या याचिकेवर उद्या चर्चा करू असं कोर्टाने सांगितलं असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे. चार ते पाच केसेस अशा प्रकारच्या कोर्टासमोर आल्या आहेत. मध्य प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू यांच्याही केसेस आहेत. केंद्र सरकारने आम्हाला इम्पेरिकल डेटा द्यावा, अशी एक केस आपण तीन महिन्यांपूर्वी केली होती. त्याचबरोबर निवडणुकीबाबत जी याचिका केली त्याची सुनावणी होती, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली. केंद्र सरकारने कोर्टात सांगितले हा ओबीसी डेटा नाही, पण केंद्राकडे जो जातीचा डेटा आहे तो आम्हाला द्या, त्यात ओबीसींच्या कोणत्या जाती आहेत ते आम्ही १५ दिवसात सांगतो, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्याने काढलेल्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली होती. ओबीसी आरक्षणाबाबत अलीकडेच राज्य सरकारनं अध्यादेश काढला होता. त्याआधारे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक होणार होती. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर एकतर निवडणुका एकत्र घ्या किंवा पूर्णपणे थांबवा, अशी मागणी घेऊन राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …