ओबीसींच्या जनगणनेसाठी वंचित बहुजन आघाडीचा विधानभवनावर मोर्चा

मुंबई – राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान मुंबईत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीने एक मोर्चा काढला होता. ओबीसी जातीनिहाय जनगणना व्हावी, राज्यातले आरक्षण वाचले पाहिजे या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
विधानभवनावर आलेल्या या मोर्चादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले, राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाची मागणी कोर्टात लावून धरली नाही. म्हणून ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले आहे. म्हणून हा मोर्चा काढण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था पाहणे ज्यांची जबाबदारी आहे, त्यांनी ती घ्यावी. आमचे आंदोलन शांततेत सुरू आहे, ते सुरू राहणार. कारण तो आमचा अधिकार आहे. कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले तरी आमचे आंदोलन सुरू राहणार आहे.

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, शासनाला योग्य रितीने निर्णय घेता यायला हवा. आता साडेचारशे कोटींची तरतूद केली आहे, पण त्यासाठी जनगणना करणारा कायदा राज्य शासनाकडे कुठे आहे?, अधिवेशनात तो कायदा केला पाहिजे. कारण सर्वोच्च न्यायालयाने तो मागितलेला आहे. तो कायदा केला आणि जनगणना समितीकडे हे पैसे वळवले, तर ही समितीच ओबीसी जनगणना करून सर्वोच्च न्यायालयाकडे अहवाल देईल, पण या सरकारचा हेतू खोटा आहे. ज्याप्रमाणे त्यांनी गरीब मराठ्यांचे आरक्षण संपवले, तसेच ते ओबीसींचेही संपवत आहेत. या आंदोलनादरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यामुळे पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात गोंधळ झाला.

About Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …