ठळक बातम्या

ऑस्ट्रेलिया आता अद्याप टी-२० मधील खूप चांगला संघ – फिंच

दुबई – कर्णधार ॲरोन फिंच म्हणाला की, ऑस्ट्रेलिया अद्याप टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक चांगला संघ असून, इंग्लंडकडून मिळालेल्या पराभवाचा प्रभाव आगामी टी-२० विश्वचषकातील सामन्यांवर पडणार नाही.

इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला १२५ धावांत गुंडाळले व त्यानंतर ५० चेंडू शिल्लक राखत धावांचा पाठलाग केला. आता ऑस्ट्रेलियाचा सामना ४ नोव्हेंबरला बांगलादेश व ६ नोव्हेंबरला वेस्ट इंडिजविरुद्ध होईल. फिंच म्हणाला की, सुपर-१२ च्या अखेरच्या दोन सामन्यात आम्ही कोणताही हलगर्जीपणा करणार नाही. आमच्याकडे ताजेतवाणे होण्यासाठी काही दिवस आहेत. ग्रुपमध्ये अनेक अनुभवी खेळाडू उपस्थित आहेत. मी त्याबाबत चिंतेत नाही की, आम्ही या पराभवामुळे पुढील सामन्यात खराब खेळू. आम्हाला पुढील सामन्यात निश्चितपणे विजय नोंदवावा लागेल. मला वाटते की, नेट रन रेटच्या आधारावर शनिवारच्या सामन्यामुळे खूप खराब प्रभाव पडेल. त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट कामगिरी करावी लागेल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …