ऑस्ट्रेलियाला यंदा ‘टी-२० वर्ल्ड कप’ जिंकून देणारा मॅथ्यू वेड घेणार निवृत्ती!

‘अ­ॅशेस’मधूनही बाहेर
मुंबई – ऑस्ट्रेलियाने यंदा अनेकांचे अंदाज चुकवत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. रविवारी (१४ नोव्हेंबर) दुबईत झालेल्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा ८ विकेट्सनी एकतर्फी पराभव केला. त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने सेमी फायनलमध्ये पाकिस्तानचा ५ विकेट्सनी पराभव केला होता. आता पुढील टी-२० वर्ल्ड कप पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियातच होणार आहे. घरच्या प्रेक्षकांसमोर हे विजेतेपद राखण्याचे ऑस्ट्रेलियन टीमसमोर आव्हान आहे. मात्र, या टी-२० वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेण्याच्या विचारात मॅथ्यू वेड आहे. पुढील वर्षी होणारा वर्ल्ड कप ही माझी प्रेरणा आहे. त्या वर्ल्ड कपमध्ये खेळायला मिळेल अशी मला आशा आहे. आम्हाला हा वर्ल्ड कप आमच्याकडेच ठेवायचा आहे. त्यानंतर मी निवृत्ती घेऊ शकतो. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट तरी नक्कीच खेळणार नाही. न्यूझीलंड विरुद्धच्या फायनलपूर्वी ट्रेनिंग करताना स्नायू दुखावले होते, असा खुलासाही मॅथ्यू वेडने केला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तानवरील विजयात विकेट किपर-बॅट्समन मॅथ्यू वेडचे मोलाचे योगदान होते. वेडने पाकिस्तान विरुद्ध १७ चेंडूंमध्ये ४१ धावांची खेळी केली होती. त्याने शाहीन आफ्रिदीला सलग तीन सिक्स लगावत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. इंग्लंड विरुद्धची प्रतिष्ठेची अ­ॅशेस सीरिज पुढील महिन्यात सुरू होत आहे. टी-२० वर्ल्ड कपनंतर ही स्पर्धा जिंकण्याचे ऑस्ट्रेलियाचे ध्येय आहे. या सीरिजमधील पहिल्या दोन टेस्टसाठी ऑस्ट्रेलियन टीम जाहीर झाली आहे. यामध्ये सेमी फायनल जिंकून देणारा मॅथ्यू वेड आणि फायनलमधील ‘मॅन ऑफ द मॅच’ मिचेल मार्शचा टीममध्ये समावेश करण्यात आलेला नाही. मॅथ्यू वेडच्या जागेवर ट्रेविस हेडचे टीममध्ये पुनरागमन झाले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …