ठळक बातम्या

ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ अपयशाचा फायदा घेऊ पाहिल श्रीलंका

दुबई – माजी चॅम्पियन श्रीलंका आयसीसी टी-२० सुपर-१२ च्या ग्रुप एकच्या गुरुवारी होणाऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या अव्वल फळीतील फलंदाजांच्या खराब कामगिरीचा फायदा घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल.

श्रीलंकाने २०१४ मध्ये जेतेपद जिंकले होते, पण त्यावेळी त्यांना क्वालिफायर्स खेळावे लागले, जिथे तीन सामने जिंकत अव्वल स्थानी राहिले. त्यानंतर सुपर-१२ च्या आपल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा ५ विकेटने पराभव केला. दुसरीकडे, आतापर्यंत टी-२० विश्वचषक जिंकू न शकलेला ऑस्ट्रेलियाला पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकाविरुद्ध ११९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला. त्यांची धावसंख्या एक वेळ ३ बाद ३८ धावा होती व ते अखेरच्या षटकात विजय मिळवू शकलेले. कर्णधार ॲरोन फिंच खातेही खोलू शकला नव्हता. मागील काही वेळेपासून धावा करण्यासाठी प्रयत्नशील असलेला डेव्हिड वॉर्नर पुन्हा एकदा स्वस्तात माघारी परतला. मिशेल मार्शची फलंदाजीही खराब दिसत आहे. ऑस्ट्रेलियाला चांगल्या सुरुवातीची खास गरज आहे व त्यासाठी फिंच व वॉर्नरवर ते अवलंबून आहेत. जर ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेच्या फिरकीपटंूचा सामना करायचा आहे, तर या दोघांना चांगली कामगिरी करावी लागेल. स्टीव्ह स्मिथने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डाव सावरला व स्पर्धेत पुढे जाण्यासाठी त्याची कामगिरी महत्त्वाची ठरेल. फिंचला मार्शकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. ऑस्ट्रेलियासाठी चांगली गोष्ट अशी की, ग्लेन मॅक्सवेलने फलंदाजी व गोलंदाजी दोघांत आयपीएलमधील आपला फॉर्म कायम राखला. त्याने मागील सामन्यात चार षटकात एक विकेट घेत कर्णधाराला पर्याय उपलब्ध करून दिला. पण श्रीलंकन संघातही एकापेक्षा एक असे चांगले फिरकीपटू आहेत. अशात येथील धिम्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन फलंदाजांसाठी धावा करणे सोप्प नसेल.
दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्ध न खेळणारा महिश दिक्षणाच्या पुनरागमनाने संघाचा आत्मविश्वास वाढेल. लेग स्पिनर वानिंदु हसरंगाची कामगिरी देखील श्रीलंकेसाठी महत्त्वाची ठरेल. ऑस्ट्रेलिया पूर्णपणे आपल्या वेगवान गोलंदाजांवर विसंबून आहे. जॉश हेजलवुडने आयपीएल चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जच्या वतीने आपली क्षमता दाखवली. त्याच्यासोबत मिशेल स्टार्क व पॅट कमिन्स श्रीलंकन फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकतात. जर ऑस्ट्रेलिया सुरुवातीला विकेट मिळवते, तर श्रीलंका दबावात येईल. सलामी फलंदाज कुशाल परेरा धोकादायक ठरू शकतो, पण हेजलवुड व त्याच्या सहकाऱ्यांसमोर त्याची अग्निपरीक्षा असेल. कर्णधार दासुन शनाकाला चरिथ असलंका, पथुम निसांका व अविष्का फर्नांडोकडून चांगल्या योगदानाची अपेक्षा आहे. असलंकाने मागील सामन्यात संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. अशा परिस्थितीत सामन्याचा निकाल मोठ्या प्रमाणात संघाच्या फलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

4 comments

  1. Pingback: คาสิโน 168

  2. Pingback: No code testing tools

  3. Pingback: Full Report

  4. Pingback: Dan Helmer