ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंड बॅकफूटवर

मेलबर्न – अ‍ॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसरा दिवस रंगतदार ठरला. इंग्लंडला वरचढ होण्याची संधी होती, पण दिवसअखेरीस ऑस्ट्रेलियाने भेदक मारा करून इंग्लंडला बॅकफूटवर ढकलले. काल ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पहिला डाव १८५ धावात गुंडाळला. त्यानंतर दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या १बाद ६१ धावा झाल्या होत्या. मात्र सोमवारी दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर इंग्लिश गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. सलामीवीर मार्कस हॅरिसने सर्वाधिक (७६) धावा केल्या. त्याचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी फारशी चमकदार कामगिरी केली नाही आणि ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २६७ धावांत संपुष्टात आला. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने सर्वाधिक चार, रॉबिनसन, वूडने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
ऑस्ट्रेलियाकडे फ क्त ८२ धावांची आघाडी होती. त्यामुळे इंग्लंडला कसोटीत पुनरागमन करण्याची संधी होती, पण ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी इंग्लंडचे मनसुबे उधळून लावले. दुसऱ्या दिवस अखेर इंग्लंडच्या ४ बाद ३१ धावा झाल्या आहेत. इंग्लंड अजूनही ५१ धावांनी पिछाडीवर आहे. कर्णधार जो रूट अजूनही खेळपट्टीवर उभा आहे, हाच काय तो इंग्लंडसाठी आशेचा किरण आहे. हासीब हमीद (७), झॅक क्रॉली (५) हे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले. डेविड मलान भोपळाही न फोडता तंबूत परतला. जॅक लीचही शून्यावर बाद झाला. वेगवान गोलंदाज स्टार्क आणि बोलँडने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. कदाचित आजच या कसोटी सामन्याचा निकाल लागू शकतो.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …