सिडनी – ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकल स्लॅटरला कौटुंबिक हिंसाचाराप्रकरणी ऑक्टोबर महिन्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. आता या प्रकरणात न्यायालयीन आदेश भंग केल्यामुळे त्याला पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. स्लॅटरने आयपीएल स्पर्धेत कॉमेंट्री देखील केली आहे. न्यू साऊथ वेल्स पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्लॅटरला बुधवारी पहाटे ४ वाजता अटक करण्यात आली. स्लॅटरवर एव्हीओ (ॲप्रेहेंडेड व्हायोलन्स ऑर्डर)मधील निर्धारित नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचा तसेच याबाबत न्यायालयाने दिलेले आदेश न पाळल्याचा आरोप आहे. स्लॅटरला सिडनीमधील पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आले. तिथे त्याला जामीन फेटाळण्यात आला. यापूर्वी स्लॅटरला २० ऑक्टोबर रोजी एका कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात अटक करण्यात आली होती. मायकल स्लॅटर हा ऑस्ट्रेलियाचा यशस्वी ओपनिंग बॅटसमन आहे. त्याने २००४ साली क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. जवळपास एक दशक तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. या काळात त्याने ७४ कसोट्यांमध्ये ४२.८३ च्या सरासरीने ५३१२ धावा काढल्या, तर ४२ एकदिवसीय सामन्यांमध्ये २४.०७ च्या सरासरीने ९८७ धावा केल्या आहेत. स्लॅटरचा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगला रेकॉर्ड आहे. त्याने २१६ सामन्यांमध्ये १४ हजार १९२ धावा केल्या आहेत, तर १३५ ‘ए’ श्रेणीच्या मॅचमध्ये ३३९५ धावा काढल्या. १९९३ साली पदार्पण करणाऱ्या स्लेटरने त्याच्या आंतरराष्ट्रीय करिअरमधील शेवटची कसोटी २००१ साली खेळली.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …
2 comments
Pingback: 토렌트 다운
Pingback: cartel & co