ऑस्ट्रेलियाचा भेदक मारा, इंग्लंड ४५६ धावांनी पिछाडीवर

मेलबर्न – अ­ॅडलेड येथे ऑस्ट्रेलिया-इंग्लंडमध्ये अ­ॅशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. शुक्रवारी दुसऱ्या दिवसाचा खेळ नियोजित वेळेआधीच संपवण्यात आला. दिवसाच्या अखेरच्या सत्रात विजा चमकून ढगाळ वातावरण झाल्याने खेळ थांबवावा लागला. दिवस अखेरीस इंग्लंडची अवस्था नाजूक आहे. निराशाजनक सुरुवातीनंतर इंग्लंडच्या दोन बाद १७ धावा झाल्या आहेत. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ४७३ धावा केल्या. इंग्लंड ४५६ धावांनी पिछाडीवर आहे. कर्णधार जो रुट (५) आणि डेविट मलान (१) धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियाचा भेदक गोलंदाज मिचेल स्टार्कने रॉरी बन्सला (४) धावांवर बाद केले. डेब्यु करणाऱ्या मायकल नीसरने हसीब हमीदला (६) धावांवर बाद केले.
त्याआधी ऑस्ट्रेलियाने नऊ विकेट पडलेल्या असताना पहिला डाव ४७३ धावांवर घोषित केला. मार्नस लाबुशेनने (१०३) दिवसाच्या सुरुवातीला शतक झळकावले. ऑस्ट्रेलियन कॅप्टन स्टीव्ह स्मिथचे शतक हुकले पण त्याने ९३ धावा केल्या. डावाच्या अखेरीस मिचेल स्टार्क आणि नीसरने वेगाने धावा करून ऑस्ट्रेलियाला ४७३ धावसंख्येपर्यंत पोहोचवले. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक तीन आणि जेम्स अँडरसनने दोन विकेट घेतल्या.
आधीच इंग्लंडचा संघ मालिकेत १-० ने पिछाडीवर आहे. गुरुवारी पहिल्या दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाने फक्त दोन विकेट गमावून २२१ धावा केल्या होत्या. इंग्लिश गोलंदाज वॉर्नर-लाबुशेन जोडीसमोर निष्प्रभ ठरले होते. ब्रिस्बेनच्या पहिल्या कसोटी प्रमाणे इथेही डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लाबुशेनमध्ये शानदार भागीदारी झाली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १७२ धावांची भागीदारी केली होती. वॉर्नरचे शतक अवघ्या पाच धावांनी हुकले. त्याने ९५ धावांच्या खेळीत ११ चौकार लगावले. वॉर्नरला स्टोक्सने बाद केले.
लाबुशेनने ब्रॅडमननाही टाकले मागे
कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पहिल्याच सेशनमध्ये मार्नस लाबुशेनने कसोटी क्रिकेटमधील दोन हजार धावा देखील पूर्ण केल्या. लाबुशेन शतकानंतर लगेच (१०३ धावा) बाद झाला. पण, या खेळीदरम्यान त्याने अनेक विक्रम केले आहेत. लाबुशेनने २० कसोट्या आणि ३४ डावांमध्ये दोन हजार धावा पूर्ण केल्या. सर्वात वेगाने दोन हजार धाव करणारा तो पाचवा फलंदाज बनला आहे. त्याच्या पुढे सर डॉन ब्रॅडमन (१५ सामने, २२ डाव), वेस्ट इंडिजचे जॉर्ज हेडली (१७ सामने, ३२ डाव), इंग्लंडचे हर्बट सटक्लिफ (२२ सामने ३३ डाव) आणि ऑस्ट्रेलियाचा माईक हसी (२० सामने ३३ डाव) हे पाच जण आहेत. लाबुशेनने यावेळी एका बाबतील ब्रॅडमन यांनाही मागे टाकले आहे. त्याने २० सामन्यांमध्ये १७ वेळा ५० चा टप्पा पार केला आहे. ब्रॅडमनने २० सामन्यांमध्ये १५ वेळा ही कामगिरी केली होती. या यादीत वेस्ट इंडिजचे ब्रायन लारा आणि सर व्हिव्हियन रिचर्ड्स हे अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. या दोघांनीही २० सामन्यांमध्ये १३ वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …